Friday, July 26, 2024

अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन

 एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड उपक्रम 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना द्वारा हरीत विद्यापीठ मोहिमे अंतर्गत विद्यापीठ परिसरात एक लक्ष वृक्ष लागवड करण्याच्या उद्देशाने दिनांक २६ जुलै रोजी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते वृक्षारोपनाचे सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वनाथ खंदारे, अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.क्षीरसागर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी वृक्षारोपन कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांशी आणि महाविद्यालयातील अधिकारी तथा कर्मचा-याशी संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना हरीत विद्यापीठ आणि वृक्षारोपनाबद्दल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. वृक्षारोपनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आतील व बाहेरील बाजुने परिसरामध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा.एच.डब्ल्यु.देशपांडे, डॉ.के.एस.गाढे, प्रभारी अधिकारी गार्डन डॉ.एस.के.सदावर्ते यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी अधिकारी डॉ.पी.यु.घाटगे तसेच वसतिगृह अधिक्षक डॉ.व्ही.डी.सुर्वे, डॉ.बी.एस.आगरकर, सहाय्यक वसतिगृह अधिक्षक डॉ.बी.एम.पाटील व डॉ.अनुप्रिता जोशी यांनी परिश्रम घेतले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ.जी.एम.माचेवाड, डॉ.ए.पी.खापरे, श्री.एस.एम.सोनकांबळे, डॉ.सी.के.भोकरे, सर्व शिक्षण सहयोगी डॉ.ठाकूर, डॉ.देशमुख, डॉ.जुबेर, डॉ.देसाई व डॉ.निसार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.