Friday, September 6, 2024

वनामकृवित बाल्य रेशीम किटक संगोपन प्रशिक्षणाचे उदघाटन

रेशीम उद्योगासारख्या शेतीपूरक जोडधंद्यास अनन्यसाधारण महत्व.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजना तर्फे अयोजीत ८ दिवसीय कार्यशाळेचे दिनांक ५ सप्टेबर रोजी उदघाटन करण्यात आले. अध्यक्ष तथा उदघाटक म्हणून कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शास्वत शेती उद्योगासाठी रेशीम उद्योगासारख्या शेतीपूरक जोडधंद्यास अनन्यसाधारण महत्व आहे. रेशीम उद्योगातील पहिला टप्पा म्हणजे बाल्य रेशीम किटक संगोपन. याबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे त्यादृष्टीने या प्रशिक्षणाची महत्वाची भूमिका आहे. यावेळी त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षणाचे महत्व विषद केले. शिक्षण घेवून डॉ. अब्दूल कलाम हे शास्त्रज्ञ झाले आणि त्यांच्या अनमोल योगदानामुळे पुढे ते देशाचे राष्ट्रपती शिक्षणामुळेच झाले. याकरिता सर्व मुलां-मुलींनी शिक्षण घेतलेच पाहिजे. देशाच्या विकासात कृषीचाक्षेत्राचा मुख्य वाटा आहे म्हणून विद्यार्थ्यांनी कृषि शिक्षणास प्राधान्य द्यावे. सद्या देशपातळीवर शालेय शिक्षणात कृषि विषय असल्याचे त्यांनी नमूद केले.

अग्रणी बॅक (स्टेट बॅक ऑफ इंडिया) चे माजी व्यवस्थापक श्री. सुनिल हटटेकर यांनी परभणी जिल्हयातील चुडावा (पुर्णा), मंगरूळ (मानवत) व पाळोदी (परभणी) येथील १०० शेतक­यांना सिल्क आणि मिल्कयोजना बँके तर्फे मंजूर करण्यात येणार असुन रेशीम उद्योजक शेतक­यांना शेळी, गाय किंवा म्हैस घेण्यासाठी रू. ८ लक्ष प्रति शेतकरी कर्जरूपाने देणार असल्याचे जाहिर केले. जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम यांनी रेशीम उद्योगाबददल असलेल्या विविध शासकिय योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव.श्री. संतोष वेणीकर हे होते तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजिव बंटेवाड, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम झंवर, विभाग प्रमुख डॉ. पुरूषोत्तम नेहरकर, आगाम साहेब, प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे, अग्रणी बॅक (स्टेट बॅक ऑफ इंडिया) चे व्यवस्थापक श्री. उदय कुलकर्णी, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोलंकी, शास्त्रज्ञ डॉ. हरिष अवारी, सहयोगी प्राध्यापक डॉ. धिरज कदम, डॉ.मिलींद सोनकांबळे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनंत लाड आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी बाल्य रेशीम किटक संगोपन प्रशिक्षणाचे महत्व सांगीतले. सुत्र संचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर अभार डॉ. पुरूषोत्तम नेहरकर यांनी मानले. प्रशिक्षणासाठी मराठवाडयातील ३० शेतकरी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. संजोग बोकन, श्री. दत्ता जटाळे, श्री. हरिश्चंद्र ढगे, श्री. बापुराव मुलगीर यांनी परिश्रम घेतले.