संवादामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरावर भर द्यावा.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
तांत्रिक
मार्गदर्शनात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगितला.
उद्यान विद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे यांनी हळद व अद्रक पीक
व्यवस्थापन यासाठी विकसित नवीन तंत्रज्ञान आणि वाणांची माहिती दिली. पीक रोग तज्ञ
डॉ. गजेंद्र जगताप यांनी हळद व अद्रक पिकातील रोग आणि त्यांचे नियंत्रण याविषयी तर
कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात बहुसंख्येने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हळद व अद्रक विकास सह सोयाबीन, कापूस, फळबाग याविषयी प्रश्न विचारले यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. दिगंबर पटाईत. डॉ. अनंत लाड, डॉ. गजानन गडदे यांनी समाधानकारक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.