Tuesday, July 1, 2025

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात साजरी

 कृषिदिनाचे औचित्य साधून केले वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी ‘कृषिदिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी महाविद्यालयाच्या सभागृहात स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थीनी श्रावणी जाधव हिने वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रातील योगदान आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जांभूळ, करंज आणि कडूनिंब यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी विभाग प्रमुख डॉ. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.