वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या कार्यकारी परिषद
सदस्यांसाठी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व प्रशिक्षण घेण्यासाठी दिनांक
२२ व २३ जुलै २०२५ रोजी भारतीय कृषि संशोधन संस्था (IARI), नवी
दिल्ली तसेच ड्रोन उत्पादक आयोटेक वर्ल्ड (गुरुग्राम,
हरियाणा) येथे अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ही अभ्यासभेट संपन्न झाली.
या अभ्यासदौऱ्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद
सदस्य मा.आ. अॅड. श्री. सतीश चव्हाण, मा. श्री. दिलीप देशमुख, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. श्री. सूरज जगताप,
संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार आणि कृषि अभियांत्रिकी
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके सहभागी झाले होते.
भारतीय कृषि संशोधन संस्थेच्या प्रा. एम. एस. स्वामीनाथन ग्रंथालय सभागृहात
संशोधन सहसंचालक डॉ. सी. विश्वनाथन यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या
संशोधन कार्याची माहिती दिली. यानंतर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
विद्यापीठातील चालू योजनांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती सादर केली.
भेटीदरम्यान कृषि अभियांत्रिकी विभागातील डॉ. पी. के. साहू यांनी रोबोटिक्स
आधारित आधुनिक यंत्रणा – फवारणी यंत्र व भात लागवड यंत्र यांची माहिती दिली. डॉ.
डी. के. सिंह यांनी एग्री फोटोवोल्टाइक सेंटर ऑफ एक्सलन्स संदर्भात माहिती सादर
केली, तर डॉ. पी. एस. ब्रह्मानंद यांनी संरक्षित शेतीतील वर्टिकल फार्मिंग,
हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स व पोषक तत्त्व
व्यवस्थापनावर सविस्तर मार्गदर्शन केले.
ड्रोन टेक्नोलॉजी सेंटरमध्ये डॉ. आर. एन. साहू व डॉ. एन. सुभाष पिल्लई
यांनी विविध प्रकारच्या ड्रोन आणि त्यांच्या कृषि उपयोगांविषयी माहिती दिली.
यावेळी मा. आ. अॅड. श्री. सतीश चव्हाण यांनी संशोधकांशी सखोल संवाद साधला.
दुसऱ्या दिवशी हरियाणामधील गुरुग्राम येथील आयोटेक वर्ल्ड या नामवंत ड्रोन
उत्पादक कंपनीला भेट देण्यात आली. यावेळी ड्रोनच्या डिझाईनपासून उत्पादन प्रक्रिया
व त्यांच्या विविध कृषि उपयोगांचा अभ्यास करण्यात आला. या वेळी माननीय कुलगुरूंनी
उपस्थितांना मार्गदर्शन केले तर माननीय श्री. भागवत देवसरकर यांनी कंपनी
प्रतिनिधींशी चर्चा केली.
ही अभ्यासभेट कार्यकारी सदस्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, विद्यापीठात नव्या
तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी प्रेरणादायी ठरली आहे.