भोसी (ता. भोकर) येथील सृष्टी फळ रोपवाटिकेत भव्य फळझाड लागवड कार्यक्रम संपन्न
शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जर शेतकरी नसेल, तर कृषि विद्यापीठाचंही अस्तित्व अर्थहीन ठरेल. अन्नदाता शेतकरी विविध अन्नधान्य पिकवून संपूर्ण समाजाला अन्न पुरवतो. म्हणूनच ‘शेतकरी देवो भव:’असे म्हणावे लागेल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. ते भोसी (ता. भोकर) येथील शेतकरी श्री. नंदकिशोर गायकवाड यांच्या सृष्टी फळ रोपवाटिका येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते.
हा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून काळ्या
मातीशी निष्ठा राखत ही धरती सदैव हिरवीगार राहावी, या हेतूने
पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम भोसी (ता. भोकर, जि. नांदेड) येथील सृष्टी फळ रोपवाटिका येथे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत १६
जुलै २०२५ रोजी घेण्यात आला. यावेळी भव्य फळझाड लागवड कार्यक्रम देखील करण्यात आला.
यावेळी जिल्हा कृषि अधीक्षक श्री. दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय कृषि
अधिकारी श्री. राजकुमार रणवीर, उपविभागीय अधिकारी श्री.
विठ्ठल गित्ते, तसेच प्रगतिशील शेतकरी श्री. रत्नाकर पाटील
सायाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पुढे बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, स्वातंत्र्यपूर्व
काळात भारतात केवळ ५ मिलियन टन अन्नधान्य उत्पादन होत होते. आज शेतकऱ्यांच्या अथक
कष्टामुळे आपण ३५० मिलियन टन अन्नधान्य उत्पादनाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आता
आपला देश संपूर्ण जगाला अन्न पुरवठा करण्यास सक्षम आहे.
कार्यक्रमानंतर माननीय कुलगुरूंनी शिवार फेरी करून नंदकिशोर गायकवाड
यांच्या फळबागेतील अंतरपीक व्यवस्थापनाची पाहणी केली. तसेच वृक्षारोपण करून
पर्यावरणपूरक शेतीचा संदेश दिला. यावेळी नंदकिशोर गायकवाड यांनी या वर्षी शेतात ५,००० वृक्षांची
लागवड करण्याचा संकल्प केल्याची माहिती दिली.
माननीय कुलगुरूंच्या भेटीनंतर गावात तब्बल एक तास
जोरदार पाऊस झाला, यामुळे संपूर्ण गावकरी अत्यंत आनंदित झाले. या मार्गदर्शन कार्यक्रमास
परिसरातील १०० हून अधिक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.