माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले विद्यार्थ्याचे अभिनंदन
कुमारगंज
(अयोध्या) येथील आचार्य नरेंद्र देव कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठात २२ वा अखिल
भारतीय आंतर-कृषि विद्यापीठीय क्रीडा महोत्सव २०२४-२५” नुकताच संपन्न झाला. या
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील विविध कृषि विद्यापीठांतील
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या क्रीडा संघांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये
सहभाग नोंदवला. या संघांना रवाना करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी विशेष मार्गदर्शन व यशासाठी शुभेच्छा दिल्या.
या
स्पर्धेत विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी श्री. ओम
पोले यांनी ८०० मीटर शर्यतीत तिसरे स्थान (Bronze Medal) पटकावून उल्लेखनीय
कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठाचे राष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल
झाले आहे.
विद्यार्थी ओम पोले यांच्या यशाबद्दल माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, प्रशिक्षक प्रा. डी. एफ. राठोड व प्रा. शिनगारे यांची उपस्थिती होती.