वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्नतंत्र महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि हे यांच्या ऑनलाईन अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी व्याखानमालेचा एक भाग दिनांक ११ जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.बी. क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्राहक सेवा व अन्नसुरक्षा (आशिया खंड) जनरल मिल्सचे वरिष्ठ
महाव्यवस्थापक श्री अनिल धर्माधिकारी, व महाराष्ट्र
शासनाचे वस्तू व सेवा कर विभागाचे सहाय्यक
आयुक्त श्री विवेक शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी
व्याख्यान दिले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी असे नमुद केले कि, अन्नतंञ महाविद्यालयाने सुरु केलेला
हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि निश्चीतच या उपक्रमाअंर्तगत आयोजित करण्यात येणारे
मार्गदर्शनपर व्याख्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरिता दिशादर्शक ठरतील तसेच
त्यांच्या भावी आयुष्यात भरभराट करण्यास मदत करेल.
सहयोगी
अधिष्ठाता डॉ. आर.बी. क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. याप्रसंगी
माजी विद्यार्थी श्री. अनिल धर्माधिकारी लिखीत "फूड कल्चर इन वेदिक
रामायण" या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. श्री.
धर्माधिकारी यांनी वेदिक काळातील अन्नसंस्कृति व त्याकाळी अस्तिवात असलेल्या
अन्नप्रक्रिया तंञज्ञानाबद्दल माहिती दिली. तसेच वेदिक काळातील अन्नसंस्कृति व
अन्नतंञ याचा अभ्यास व संशोधन हा एक दुर्लक्षित विषय आहे व याचा अभ्यास करणे
काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले तसेच अन्न नियम व नियमन या विषयाबद्दल त्यांनी
विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. कार्यक्रमाकरीता आर्वजून उपस्थित असलेले माजी
विद्यार्थी श्री विवेक शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे आयोजित केल्या
जाणा-या विविध स्पर्धा परिक्षा व या परिक्षा उतीर्ण होण्यासाठी सातत्य व कठोर
परिश्रम याशिवाय दुसरा पर्याय नाही असे नमूद केले.
.jpeg)