मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण उत्पादनासाठी मोठा फायदा होईल....माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे येथील कांदा आणि लसूण
संशोधन संचालनालय यांच्यात दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सामंजस्य करार करण्यात आला.
या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी
होते.
या करारावर कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.
विजय महाजन आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर
विद्यार्थ्यांना कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयातील आधुनिक प्रयोगशाळांमध्ये
संशोधनाची संधी मिळणार आहे. याशिवाय, दोन्ही
संस्थांमध्ये संयुक्त संशोधन कार्यास गती मिळणार असून, विद्यापीठातील
भाजीपाला संशोधन केंद्रामार्फत नविन संशोधन प्रकल्प हाती घेता येणार आहेत.
या माध्यमातून विकसित होणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील
शेतकऱ्यांना कांदा आणि लसूण उत्पादनासाठी मोठा फायदा होईल, असा विश्वास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. भगवान आसेवार संचालक शिक्षण, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे,
संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, तसेच कांदा आणि
लसुण संशोधन संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजिव काळे आणि डॉ. भुषण बिबवे
उपस्थित होते.