वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील कृषि
महाविद्यालया परभणी अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) आणि कृषि औद्योगीक संलग्नता उपक्रम (AIA) व कोरडवाहू
शेती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील शेतकऱ्यांसाठी पिक
मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम (कृषि मेळावा) भारस्वाडा येथे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारस्वाडा गावचे सरपंच श्री. व्यंकटी
शिंदे,
तर प्रमुख अतिथी म्हणून सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभाग प्रमुख डॉ. पि. एस. नेहरकर, शास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, डॉ. राजेंद्र जाधव व डॉ.
प्रशांत जाधव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद
भोगांवकर व प्रा. वैशाली बास्टेवाड, कृषि सहाय्यक श्री.
कच्छवे तसेच प्रगतशील शेतकरी श्री. प्रमोद शेळके, श्री.
नागोराव मंदिलवार, श्री. ज्ञानेश्वर भोसले, श्री. हनुमंतराव जुमरे व श्री. देविदास भालेराव आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी
उत्तरे देऊन चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात आले. कृषि महाविद्यालयाच्या वतीने
निरनिराळ्या रोगांवर तयार केलेल्या विशेष प्रकारची कीटकनाशकांचे प्रदर्शन
ज्यामध्ये बायोमिक्स, ट्रायकोडर्मा, स्टिकी स्ट्रॅप, फेरोमन ट्रॅप, फ्रुटफ्लाय ट्रॅप, तुर व सोयाबीनचे विविध वाण मांडण्यात आले होते.
भारस्वाडा-उमरी या गावांमध्ये कृषि महाविद्यालयाचे ग्रामीण जागरूकता
कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषि कन्या आणि कृषि दुतानी कार्यक्रमाचे आयोजन करून
योग्यरित्या कार्यक्रम पार पाडला. या कृषि मेळाव्याला भारस्वाडा-उमरी येथील बहुसंख्य
शेतकरी उपस्थित होते.