Monday, November 28, 2016

क्रीडा महोत्‍सवातील मैदानी स्‍पर्धेचे निकाल

शंभर मीटर धावणे महिला - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
शंभर मीटर धावणे पुरूष - विजयी खेळाडु सोबत विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. केदार सांळुके, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, प्राचार्य हेमंत पाटील, प्रा डि एफ राठोड आदी
क्षणचित्र - शंभर मीटर धावणे महिला
गोळा फेक महिला-विजेयी खेळाडु सोबत मान्‍यवर

छायाचित्र - गोळा फेक महिला

Sunday, November 27, 2016

क्रीडा स्‍पर्धेतील काही खेळांचे हाती आलेले निकाल दिनांक 28 नोब्‍हेंबर वेळ सायं 5.30

क्षणचित्र - डॉ पंजाबराव देशमुख  कृषि विद्यापीठ, अकोला विरूध्‍द सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

क्षणचित्र - मुंबई विद्यापीठ, मुंबई विरूध्‍द महाराष्‍ट्र पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुर

क्षणचित्र - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड


छायाचित्र - महाराष्‍ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठ, नाशिक विरूध्‍द डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

छायाचित्र - महाराष्‍ट्र् पशु व मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठ, नागपुरू विरूध्‍द शिवाजी विद्यापीठ, कोल्‍हापुर
छायाचित्र : खो खो महिला - स्‍वामी रामा‍नंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड‍ विरुध्‍द डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली.


छायाचित्र -खो खो - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विरूध्‍द डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

छायाचित्र - कबड्डी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी विरूध्‍द डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, परभणी
छायाचित्र - कबड्डी महिला - उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ, जळगांव विरूध्‍द स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

महाविद्यालयीन युवकांनी समाजात सकारात्‍मक बदल घडविण्‍यासाठी कार्य करावे ......नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

वनामकृवित विसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धाचे शानदार उद्घाटन



महाविद्यालयीन युवकांनी समाजात सकारात्‍मक बदल घडविण्‍यासाठी कार्य करावे. देशात घडण्‍ाा-या समाज विघातक घटना रोखण्‍यांंसाठी युवकांनी पुढाकार घ्‍यावा, असे प्रतिपादन प्रमुख अतिथि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे दिनांक २७ नोव्‍हेंबर ते  डिसेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ क्रीडा स्‍पर्धांच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्‍यासपीठावर जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुलरंजन महिवाल, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. श्री अनंतराव चौंदे, मा. श्री रविंद्र देशमुख, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव श्री दिलीप कच्‍छवे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष पोलिस महा‍निरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद पुढे म्‍हणाले की, शेतकरी आत्‍महत्‍या, अन्‍नसुरक्षा, स्‍वच्‍छता मोहिम आदीं बाबतीत महाविद्यालयीन युवकांनी योगदान द्यावे. समाजात शांतता व सुरक्षितता राखण्‍यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.
भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्‍या युगात युवक प्रत्‍यक्ष क्रीडांगणावर कमी व स्‍मार्टफोनवर जास्‍त वेळ घालवत आहेत. आजकालच्‍या जीवनशैली मुळे अनेक शारिरीक व मानसिक व्‍याधी कमी वयातच युवकांना ग्रासत आहेत, हे रोखण्‍यासाठी विविध क्रीडा प्रकारात युवकांनी सक्रीय सहभाग घ्‍यावा. खेळाच्‍या माध्‍यमातुन आपले शरीर व मन तंदुरूस्‍त ठेवावे, असा सल्‍ला देऊन उत्‍कृष्‍ट आयोजनाबाबत विद्यापीठाची प्रशंसा केली.  
जिल्‍हाधिकारी मा. श्री. राहुलरंजन महिवाल आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, क्रीडास्‍पर्धेच्‍या माध्‍यमातुन महाविद्यालयीन युवकाच्‍या विविध क्रीडा गुणांचा विकास होतो, महाराष्‍ट्र राज्‍यातील खेळाडुंना या क्षेत्रात मोठा वाव आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सहभागी खेळाडुंना शिस्‍तीचे पालन करून आपल्‍या क्रीडा गुणांचे प्रदर्शन करण्‍याचा सल्‍ला दिला.   
शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी स्‍वागतपर भाषण करून खेळाडुंना शपथ दिली तर विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी प्रास्‍ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ डि जी मोरे व डॉ आशा आर्या यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्या प्रा. विशाला पटणम यांनी केले.
उदघाटन प्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून क्रीडाज्‍योत पेटविण्‍यात आली. याप्रसंगी विविध विद्यापीठाच्‍या संघानी पथसंचलन केले. स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध क्रीडा प्रकारांत सहभागी झाले असुन यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश आहे. राज्‍यातुन व स्‍थानिक पातळीवर दोनशे पंच व तीनशे संघ व्‍यवस्‍थापक सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणा-या क्रीडा स्‍पर्धेत सहभागी खेळाडुंना मोफत वाय-फायची सुविधा पुरविण्‍यात आली आहे. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍याचे लोकनृत्‍य वाघ्‍यामुरळीचे सादरिकरण करण्‍यात आले. स्‍पर्धेनिमित्‍त एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे तसेच समारोपाच्‍या दिनी रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले आहे
मार्गदर्शन करतांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा. श्री. चिरंजीव प्रसाद

मार्गदर्शन करतांना भारतीय कृषि संशोधन परिषदेचे मा. डॉ. जी. व्‍यकंटेश्‍वरलु 

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना जिल्‍हाधिकारी मा. श्री राहुलरंजन महिवाल

Friday, November 25, 2016

वनामकृवित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा स्‍पर्धेनिमित्‍त पत्रकार परिषद संपन्‍न




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विसावी महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्‍सवाचे आयोजन दिनांक २७ नोव्‍हेंबर ते १ डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन त्‍यानिमित्‍त दिनांक २५ नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख, विद्यापीठ अभियांता श्री. ए. एल. रूमणे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. डि. बी. देवसरकर, विभाग प्रमुख डॉ राकेश आहिेरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ ए एस जाधव, डॉ. काळपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ महेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक खिल्‍लारे यांनी केले. सदरिल पत्रकार परिषदेत कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी पत्रकारांना संबोधीत केले. यावेळी स्‍पर्धेसाठी करण्‍यात येत असलेल्‍या मैदानाची सर्व उपस्थितांनी पाहणी केली.

प्रेस नोट

वनामकृवित विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतर विद्यापीठ अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन दिनांक २७ नोव्‍हेंबर ते एक डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेचे उद्घाटन आंतरराष्‍ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्‍कार प्राप्‍त ललिता बाबर  नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार आहेत. स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त मुले  मुली विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. स्‍पर्धा पाच खेळ प्रकारात होणार आहेत, यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश राहणार आहे. विद्यापीठ क्रीडा संकुलावर मैदानी स्‍पर्धेसाठी ४०० मीटरचा धावप‍थ व विविध खेळांची मैदाने तयार करण्‍यात आले असुन काही मैदानावर फ्लडलाईंटचीही व्‍यवस्था करण्‍यात आली आहे.  या निमित्‍त विद्यापीठात मैदाने अद्ययावत करणे, निवास व भोजन व्‍यवस्‍था, रस्‍ते व इमारती दुरूस्‍ती, रंगरंगाटी आदी कामे अंतिम टप्‍प्‍यात आहेत. राज्‍यातुन व स्‍थानिक पातळीवर दोनशे पंच व तीनशे संघ व्‍यवस्‍थापक सहभागी होणार आहेत. येणा-या खेळाडुंसह व्‍यवस्‍थापक, पंच, अधिकारी व सहभागी यांची निवासाची व भोजनाची विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
स्‍पर्धेचा समारोप दिनांक  डिसेंबर रोजी होणार असुन जागतिक दिनानिमित्‍त महाविद्यालयीन युवकांत एड्स रोगाविषयी प्रबोधनाचे कार्य करण्‍यात येणार आहे. या दिवशी एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे तसेच रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम नांदेड येथील स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले असुन विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी य्यत तयारी करीत आहेत.



Saturday, November 19, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक पुरूष दिन साजरा


टिप- सदरिल बातमी प्राचार्य, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍याकडुन प्राप्‍त

Thursday, November 17, 2016

वनामकृवित आयोजित अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धेची तयारी अंतिम टप्‍प्‍यात

राज्‍यातील वीस विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त खेळाडुंचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात विसाव्‍या महाराष्‍ट्र राज्‍य आंतरविद्यापीठ अश्‍वमेध क्रीडा स्‍पर्धांचे आयोजन दिनांक २७ नोव्‍हेंबर ते एक डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन स्‍पर्धेचे उद्घाटन आंतरराष्‍ट्रीय धावपटू तथा अर्जुन पुरस्‍कार प्राप्‍त ललिता बाबर व नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. जी. व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु राहणार असुन स्‍पर्धेत राज्‍यातील २० विद्यापीठातील दोन हजार पेक्षा जास्‍त मुले व मुली विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणार आहेत. स्‍पर्धा पाच खेळ प्रकारात होणार आहेत, यात कबड्डी, बास्‍केटबॉल, व्‍हॉलीबॉल, खो-खो व मैदानी स्‍पर्धा या खेळांचा समावेश राहणार आहे. विद्यापीठ क्रीडा संकुलावर मैदानी स्‍पर्धेसाठी ४०० मीटरचा धावप‍थ व विविध खेळांची मैदाने तयार करण्‍याचे काम अंतिम टप्‍यात असुन काही मैदानावर फ्लडलाईंटचीही व्‍यवस्था करण्‍यात आली आहे. बॉस्‍केटबॉलसाठी दोन तर व्‍हॉलीबॉलसाठी चार मैदाने असुन कबड्डी व खोखो प्रत्‍येकी चार मैदाने तयार करण्‍यात येत आहेत. 
या निमित्‍त विद्यापीठात मैदाने अद्ययावत करणे, निवास व भोजन व्‍यवस्‍था, रस्‍ते व इमारती दुरूस्‍ती, रंगरंगाटी आदी कामे अंतिम टप्‍प्‍यात आहेत. राज्‍यातुन व स्‍थानिक पातळीवर दोनशे पंच व तीनशे संघ व्‍यवस्‍थापक सहभागी होणार आहेत. येणा-या खेळाडुंसह व्‍यवस्‍थापक, पंच, अधिकारी व सहभागी यांची निवासाची व भोजनाची विशेष व्‍यवस्‍था करण्‍यात आली असुन महाराष्‍ट्राची पुरणपोळीचा भोजनात समावेश राहणार आहे. 
स्‍पर्धेचा समारोप दिनांक  डिसेंबर रोजी होणार असुन जागतिक दिनानिमित्‍त महाविद्यालयीन युवकांत एड्स रोगाविषयी प्रबोधनाचे कार्य करण्‍यात येणार आहे. या दिवशी एड्स विषयी प्रबोधनपर प्रदर्शनीचे तसेच रॅलीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम नांदेड येथील स्‍वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांच्‍या प्रमुख उपस्थित होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु व शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध समित्‍यांचे गठण करण्‍यात आले असुन विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी य्यत तयारी करीत आहेत, अशी माहिती स्‍पर्धेचे मुख्‍य आयोजक तथा विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. महेश देशमुख यांनी दिली.