वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत
विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय आणि कृषी महाविद्यालय, पाथरी
यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव २०२६-२७ अंतर्गत
लिटरेरी व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन मंगळवार, दि. १
सप्टेंबर २०२६ रोजी कृषी महाविद्यालय, पाथरी येथे करण्यात
आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून
विद्यापीठांतर्गत एकूण १३ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या
बौद्धिक, साहित्यिक व सर्जनशील
गुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यातील ज्ञान, वक्तृत्व,
तर्कशक्ती आणि सामान्यज्ञान विकसित व्हावे, या
उद्देशाने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी
उत्साहाने सहभाग घेत आपल्या गुणवत्तेचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी तसेच इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ,
रायपूरचे माजी कुलगुरू तथा अखिल भारतीय कुलगुरू संघाचे माजी अध्यक्ष
माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील होते. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे संचालक शिक्षण
डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी
कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आणि अहमदनगर येथील सुप्रसिद्ध कवी श्री. राजेसाहेब
कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच क्रीडा अधिकारी डॉ. संघर्ष शृंगारे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धांमध्ये
वक्तृत्व स्पर्धेसाठी २५ स्पर्धक, इंग्रजी वादविवाद स्पर्धेसाठी ९ संघ, हिंदी वादविवाद
स्पर्धेसाठी ३ संघ, तर प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी ११ संघांनी
सहभाग नोंदविला.
या
स्पर्धांमध्ये कृषी महाविद्यालय, परभणीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इंग्रजी वादविवाद,
हिंदी वादविवाद आणि प्रश्नमंजुषा या तिन्ही स्पर्धांमध्ये प्रथम
क्रमांक पटकाविला. तसेच इंग्रजी भाषण स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला.
यशस्वी
विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१. प्रश्नमंजुषा – प्रथम क्रमांक :
श्रीराम हुलावले, चैतन्य शिंदे व आलोक
लाटे.
२. हिंदी वादविवाद – प्रथम क्रमांक : लवकुश मीना व ममता
मेहत्रे.
३. इंग्रजी वादविवाद – प्रथम क्रमांक : राज ठाकरे व मेखना
मनोज.
४. इंग्रजी भाषण – चौथा क्रमांक : निसर्ग बकाल.
अधिष्ठाता डॉ.
प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ. राजेश कदम, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम
नेहरकर आणि युवक महोत्सव प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण, डॉ. मिर्झा बेग आणि श्री. अमोल
सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.
या यशामागे
विद्यार्थ्यांची मेहनत तसेच त्यांना सातत्याने मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे
लिटरेरी स्पर्धा प्रभारी डॉ. संतोष फुलारी,
सांस्कृतिक प्रभारी डॉ. संदीप बडगुजर, क्रीडा
प्रभारी डॉ. धीरज पाथ्रीकर, सांस्कृतिक प्रभारी (मुले) श्री.
अमोल सोनकांबळे आणि सांस्कृतिक प्रभारी (मुली) डॉ. अनुराधा लाड यांचे मोलाचे
योगदान आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी महाविद्यालय, पाथरीचे प्राचार्य डॉ. आर. एस. मुळे, उपप्राचार्य डॉ. एस. बी. जैसवाल, डीजेपीएस कॅम्पसचे रजिस्ट्रार डॉ. रमेश इंगोले, व्यवस्थापक श्री. रमेश पाटील, क्रीडा अधिकारी श्री. एस. डी. वाघमारे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी वर्गातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

