मोहाली येथे ‘बायोई³’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन; माननीय केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची प्रमुख उपस्थिती
परिषदेत वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे कृषि जैव-निर्मिती क्षेत्रातील नवकल्पनांवर सादरीकरण
देशातील जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या
उद्देशाने ‘बायोई³ (Biotechnology for Economy,
Environment and Employment) : Enabling Scales for Industry-Ready
Biomanufacturing’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पंजाबमधील मोहाली येथील बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड
इनोव्हेशन कौन्सिल–नॅशनल अॅग्री-फूड अँड बायोमॅन्युफॅक्चरिंग इन्स्टिट्यूट (BRIC-NABI) येथे करण्यात आले.
या परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान तसेच
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह
उपस्थित होते. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव तथा बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड
इनोव्हेशन कौन्सिलचे महासंचालक प्रा. राजेश एस. गोखले, BRIC-NABI चे कार्यकारी संचालक प्रा. अश्विनी पारीक,
वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विविध
क्षेत्रांतील वैज्ञानिक, संशोधक, उद्योग प्रतिनिधी आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.
याप्रसंगी माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ‘ग्रीन फोर्ज – शेपिंग द क्रॉप्स ऑफ टुमॉरो’ या
अत्याधुनिक संशोधन सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमध्ये प्रकाशाची
तीव्रता व गुणवत्ता, आर्द्रता आणि तापमान नियंत्रित
करून विविध पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करता येणार आहेत. त्यामुळे आधुनिक तसेच
जनुकीय सुधारित पिकांच्या विविध हवामान परिस्थितींतील कार्यक्षमतेचा अभ्यास
करण्यास संशोधकांना मदत होणार आहे. यावेळी माननीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह
यांनी जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक संशोधन आणि जैवउत्पादन क्षेत्राच्या एकत्रीकरणातून कृषि व संलग्न
विज्ञान क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, असा
विश्वास व्यक्त केला. संशोधन संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी
चंदीगड–मोहाली विज्ञान व नवोपक्रम समूह विकसित करण्याची संकल्पनाही त्यांनी
मांडली.
परिषदेतील ‘जैवउत्पादनाला प्रगत दिशा देणे’
(Advancing Biomanufacturing) या वैज्ञानिक पूर्ण अधिवेशनात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी ‘जैव-निर्मितीविषयक नवकल्पनांवर (Agri-innovations
in Biomanufacturing)’ या विषयावर सादरीकरण केले.
आपल्या सादरीकरणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाने
विकसित केलेल्या ‘बायोमिक्स’ या अभिनव
जैव-उत्पादनाची माहिती दिली. बायोमिक्समध्ये १४ उपयुक्त सूक्ष्मजीवांचा समावेश
असून, वनस्पती आरोग्य व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, पोषकद्रव्यांची उपलब्धता
तसेच पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनवाढीसाठी त्याचा उपयोग होत असल्याचे त्यांनी
नमूद केले.
बायोमिक्सच्या वापरामुळे हळद पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच विविध
रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यापीठाच्या बायोमिक्स उत्पादन व विक्री उपक्रमामुळे गेल्या पाच वर्षांत सुमारे
१९.९१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून, १.८ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला लाभ झाला आहे. तसेच दोन लाखांहून
अधिक शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचा फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषि अवशेषांच्या पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी उपयुक्त असलेल्या ‘पुसा डिकंपोझर’ तंत्रज्ञानाचीही माहिती देण्यात आली.
या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि अवशेषांचे जलद विघटन होऊन पुढील पिकाच्या
लागवडीसाठी जमीन लवकर उपलब्ध होण्यास मदत होते, असे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी स्पष्ट केले.
परिषदेत उद्योगसज्ज जैवउत्पादनासाठी आवश्यक प्रमाणवृद्धी, शाश्वत विकास, कृषि व
अन्नसुरक्षा, आरोग्य, कार्बन
कॅप्चर व उपयोग, जैवाधारित उत्पादने आणि उदयोन्मुख
तंत्रज्ञान या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. वैज्ञानिक संशोधनाचे
प्रत्यक्ष उत्पादने, तंत्रज्ञान आणि उद्योगाभिमुख
उपाययोजनांमध्ये रूपांतर करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका
असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील जैव-निर्मिती क्षेत्राची क्षमता वाढविणे, संशोधन संस्था, उद्योग आणि स्टार्टअप्स यांच्यात समन्वय मजबूत करणे तसेच जैवाधारित आणि शाश्वत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. या राष्ट्रीय परिषदेमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि क्षेत्रातील जैवतंत्रज्ञानाधारित संशोधन आणि जैव-निर्मितीविषयक नवकल्पनांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
Need
to Accelerate the Expansion of Biotechnology for Industry-Ready
Biomanufacturing
National ‘BioE³’ Conclave Organised at Mohali; Hon’ble Union Minister of State Dr. Jitendra Singh Attends as Chief Guest
VNMKV Vice-Chancellor Hon’ble Prof. (Dr.) Indra Mani Presents Agri Innovations in Biomanufacturing at the Conclave
With the objective of
promoting the economy, environment and employment generation through the
biotechnology sector in the country, a national conclave on ‘BioE³
(Biotechnology for Economy, Environment and Employment): Enabling Scales for
Industry-Ready Biomanufacturing’ was organised on August 31, 2026, at the
Biotechnology Research and Innovation Council–National Agri-Food and
Biomanufacturing Institute (BRIC-NABI), Mohali, Punjab.
Union Minister of State
(Independent Charge) for the Ministry of Science and Technology and the
Ministry of Earth Sciences, Dr. Jitendra Singh, attended the conclave as the
Chief Guest. The programme was attended by Prof. Rajesh S. Gokhale, Secretary,
Department of Biotechnology and Director General, Biotechnology Research and
Innovation Council; Prof. Ashwini Pareek, Executive Director, BRIC-NABI; Prof.
(Dr.) Indra Mani, Hon'ble Vice-Chancellor of Vasantrao Naik Marathwada Krishi
Vidyapeeth (VNMKV), Parbhani; along with scientists, researchers, industry
representatives and biotechnology experts from various fields.
On this occasion, Dr.
Jitendra Singh inaugurated the state-of-the-art research facility, ‘Green Forge
– Shaping the Crops of Tomorrow’. The facility will enable researchers to
create different environmental conditions by controlling light intensity and
quality, humidity and temperature. This will help in studying the performance
of modern as well as genetically improved crops under varying climatic
conditions.
Addressing the
gathering, Dr. Jitendra Singh expressed confidence that the integration of
biotechnology, artificial intelligence, advanced research and biomanufacturing
would create new opportunities in agriculture and allied sciences. He also
proposed the development of a Chandigarh–Mohali Science and Innovation Cluster
to strengthen collaboration among research institutions.
During the scientific
plenary session titled ‘Advancing Biomanufacturing’, Prof. (Dr.) Indra Mani,
Hon'ble Vice-Chancellor of VNMKV, delivered a presentation on ‘Agri-Innovations
in Biomanufacturing’.
In his presentation,
Prof. (Dr.) Indra Mani highlighted ‘Biomix’, an innovative bio-product
developed by the university. Biomix contains 14 beneficial microorganisms and
is useful for plant health management, disease and pest control, improving
nutrient availability, and enhancing crop quality and productivity.
He informed that the use
of Biomix has helped increase turmeric productivity while also reducing the
incidence of various diseases and pests. The university's Biomix production and
marketing initiative has generated approximately Rs. 19.91 crore in revenue
over the past five years, benefiting more than 1.8 lakh hectares of agricultural
land. More than two lakh farmers have benefited from this technology, he added.
Prof. (Dr.) Indra Mani
also shared information about the ‘Pusa Decomposer’ technology, which is useful
for the eco-friendly management of agricultural residues. Through this
technology, agricultural residues decompose rapidly, enabling the land to
become available sooner for the cultivation of the next crop.
The conclave featured
in-depth discussions on various aspects of industry-ready biomanufacturing,
including scaling up, sustainable development, agriculture and food security,
healthcare, carbon capture and utilisation, bio-based products and emerging
technologies. The dignitaries emphasised the significant role of biotechnology
in translating scientific research into practical products, technologies and
industry-oriented solutions.
Special emphasis was
placed on enhancing the country's biomanufacturing capabilities, strengthening
coordination among research institutions, industries and start-ups, and
promoting bio-based and sustainable technologies.
The national conclave provided an effective platform at the national level for showcasing the biotechnology-based agricultural research and biomanufacturing innovations of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani.