वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि
रसायनशास्त्र विभागास तुर्की येथील आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञा डॉ उल्फेत इरडाल व डॉ. गोनुल आयपिक यांनी भेट दिली व विभागातील
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण
संचालक डॉ.
विलास पाटील,
प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ. टी. बी. तांबे, डॉ सय्यद इस्माईल आदीची प्रमुख उपस्थिती होती. तुर्कीच्या शास्त्रज्ञांनी विभागाच्या
प्रयोगशाळेस भेट देऊन
समाधान व्यक्त केले. विभागातील शिक्षण व संशोधनाविषयी डॉ सय्यद इस्माईल यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना प्राध्यापक डॉ. उल्फेत म्हणाल्या की, पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी शिक्षण व संशोधन प्रामाणिकपणे कार्य केल्यास शेतकऱ्यांच्या
ब-याचश्या अडचणी दुर होऊ शकतील. शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील यांनी युवकांनी नेतृत्व गुणांचा विकास करणे गरजेचे असुन पदव्युत्तर अभ्यासक्रमातील
विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा व संशोधनाचा उपयोग
शेतक-यांच उन्नतीसाठी करण्याचा त्यांनी सल्ला दिला. यावेळी विभागातील नवप्रवेशीत
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ. सुरेश वाईकर यांनी मानले. कार्यक्रमास विभागातील विद्यार्थ्यी डॉ अनिल धमक, डॉ महेश देशमुख, प्रा.
भाग्यरेखा गजभीये, प्रा. प्रभाकर अडसुळ, संतोष पिल्लेवाड, सदाशिव अडकीणे, एस.एम.
महावलकर आदीसह कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Public Relations Officer, Directorate of Extension Education, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani - 431 402 (M.S.) (Maharashtra) INDIA
Wednesday, September 20, 2017
मराठवाडयात कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव
वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे वेळीच व्यवस्थापन करण्याचे आवाहन
सद्यस्थितीत कपाशीचे पिक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मराठवाडयातील सर्वच कापूस उत्पादक जिल्हयात आढळून येत आहे. शेंदरी बोंडअळी ही कपाशीवरील अतिशय घातक कीड असुन कपाशी पिकावर या किडीचा प्रादुर्भाव साधारणता ऑक्टोबर नंतर आढळून येतो. मागील वर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर कपाशीचे फरदड (पुर्नबहार) घेतल्याने चालु खरीप हंगामात या शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
प्रादुर्भावाची प्रमुख कारणे - कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही.हंगाम संपल्यानंतर कपाशीच्या पऱ्हाटया व अवशेष शेतात किंवा शेताजवळ तसेच रचून ठेवणे व वेळेवर विल्हेवाट न लावणे. बीटी जनुकास प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर या बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. कपाशीच्या चोहुबाजुने आश्रय पिकाच्या ओळी न लावणे. योग्यवेळी शेंदरी बोंडअळीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले आहे.
सदयस्थितीत शेतक-यांनी पुढील
प्रमाणे व्यवस्थापन करावे
प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करुन नष्ट करावे. कपाशीत डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे हेक्टरी पाच याप्रमाणे वापरावे, सरासरी 8 ते 10 पतंग प्रति सापळा सतत 2 ते 3 दिवस ही आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ट्रायकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हे.) कपाशीत लावावेत.
एक जीवंत अळी किंवा दहा हिरवी बोंडे किंवा 8-10 पतंग प्रति कामगंध सापळा सलग तीन रात्री आढळुन आल्यास आर्थिक नुकसानीची पातळी समजावी व पुढीलपैकी कोणत्याही किटकनाशकांची
फवारणी करावी
कीटकनाशके
|
प्रमाण / 10 लि. पाणी
|
अझाडिरॅक्टीन 0.15 टक्के
|
50 मिली
|
अझाडिरॅक्टीन 0.30 टक्के
|
40 मिली
|
प्रोफेनोफॉस 50 ईसी किंवा
|
20 मिली
|
थायोडीकार्ब 75 डब्ल्युपी किंवा
|
20 ग्रॅम
|
लॅमडा साहॅलोथ्रीन 5 ईसी
|
10 मिली
|
थायामिथिक्झाम 12.6 टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेड सी
|
04 मिली
|
फेनप्रोफेथ्रिन 10 ईसी
|
10 मिली
|
फेनप्रोफेथ्रिन 30 ईसी
|
04 मिली
|
क्लोरपायरीफॉस 50 टक्के + सायपरमेथ्रीन 5 टक्के इ सी
|
20 मिली
|
डेल्टामेथ्रीन 1 टक्के + ट्रायझोफॉस 35 टक्के इ.सी.
|
16 मिली
|
प्रोफेनोफॉस 40 टक्के + सायपरमेथ्रीन 4 टक्के इ.सी.
|
20 मिली
|
वरीलप्रमाण हे साध्या पंपासाठी असुन पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. शेंदरी बोंडअळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच जागरूक होऊन वरील प्रमाणे उपाययोजना कराव्यात असे अवाहान किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी.आर.झंवर, डॉ. ए. जी. बडगुजर व प्रा.बी.व्ही.भेदे यांनी केले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)

