Thursday, October 8, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘ओरिएंटेशन कार्यक्रम’

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘ओरिएंटेशन कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. नवप्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरणाशी परिचित करून देणे, अभ्यासक्रम, शैक्षणिक नियम, परीक्षा पद्धती, उपलब्ध सुविधा तसेच विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती करून देणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड होत्या. मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात शिस्त, वेळेचे नियोजन आणि नियमित अभ्यास यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला बळी पडू नये तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मानसन्मानाने व आदराने वागावे, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवन हे व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाचे असून शैक्षणिक प्रगतीसोबतच चांगले संस्कार, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी सामुदायिक विस्तार व संदेशवहन व्यवस्थापन विभागाचे विषय प्रमुख तथा शिक्षण प्रभारी डॉ. शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियम, परीक्षा पद्धती व विद्यापीठाच्या विविध विनियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक जबाबदाऱ्या, उपस्थिती, परीक्षा प्रक्रिया, अंतर्गत मूल्यमापन तसेच विद्यापीठामार्फत उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करून आपले ज्ञान, कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

२०२६ बॅचचे पाल्य प्राध्यापक डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करून महाविद्यालयीन जीवनातील अडचणी, शैक्षणिक प्रश्न किंवा अन्य बाबींबाबत विद्यार्थ्यांनी निःसंकोचपणे संबंधित शिक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान सहाय्यक पाल्यप्राध्यापक प्रा. आदिनाथ बेले तसेच महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, उपलब्ध सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सेवांची माहिती करून दिली. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची कार्यप्रणाली तसेच भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींबाबत प्राथमिक माहिती मिळाली.

कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सहाय्यक पाल्यप्राध्यापक डॉ. कल्पना लहाडे यांनी सांभाळली. त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय प्रभावीपणे केला.

सामुदायिक विज्ञान हे बहुआयामी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे क्षेत्र असून, बदलत्या काळातील कौशल्यांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य, सर्जनशीलता, नेतृत्वगुण आणि उद्योजकतेचा विकास करावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

या ओरिएंटेशन कार्यक्रमामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रम, नियम व विनियम, उपलब्ध सुविधा, विभागांची कार्यपद्धती तसेच विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळाली. नव्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन जीवनातील पहिला टप्पा आनंददायी, आत्मविश्वासपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात सुरू व्हावा, या भावनेतून त्यांचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालय परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. तुमचा शैक्षणिक प्रवास येथून सुरू होतो; ज्ञान, शिस्त आणि कौशल्यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा, या प्रेरणादायी संदेशाने नवप्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

.





























For english

Orientation Programme for Newly Admitted Students Held at College of Community Science, VNMKV

 

The College of Community Science, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, organized an Orientation Programme on 7 October 2026 for the newly admitted students of the academic year 2026–27. The programme was organized with the objective of familiarizing the newly admitted students with the academic environment of the college and providing them with information about the curriculum, academic rules and regulations, examination system, available facilities, and various academic and co-curricular activities.

The programme was presided over by Dr. Neeta Gaikwad, Dean, College of Community Science. In her address, she urged the students to give priority to discipline, time management, and regular studies throughout their college life. She advised the students not to fall prey to any inappropriate activities and to maintain a respectful and courteous attitude towards all faculty members, officers, and staff of the college. She emphasized that college life plays an important role in personality development and that, along with academic progress, students should cultivate good values, a positive outlook, and a sense of social responsibility.

On the occasion, Dr. Shankar Puri, Head, Department of Community Extension and Communication Management and In-charge of Education, provided detailed guidance to the students regarding academic rules, examination procedures, and various university regulations. He explained the structure of the curriculum, academic responsibilities, attendance requirements, examination procedures, internal assessment, and various educational opportunities available through the university. He encouraged the students to make positive use of every opportunity available during their college life to enhance their knowledge, skills, and overall personality.

Dr. Sunildatta Jakkawad, Advisor for the 2026 batch, welcomed the newly admitted students and encouraged them to approach the concerned teachers without hesitation regarding any academic difficulties, queries, or other concerns. He assured the students that the faculty and staff of the college are always ready to extend their support for their academic progress and overall development.

During the programme, Assistant Advisor Prof. Adinath Bele, along with faculty members, officers, and staff from various departments of the college, briefed the students about the functioning of their respective departments, responsibilities, available facilities, and academic services provided to students. This enabled the newly admitted students to gain a preliminary understanding of the functioning of various departments and the academic and professional opportunities available to them.

The responsibility for organizing the programme was undertaken by Assistant Advisor Dr. Kalpana Lahade, who effectively managed the planning and coordination of the event.

Community Science is a multidisciplinary field that promotes the holistic development of students. Through the programme, students were encouraged to develop their knowledge, skills, creativity, leadership qualities, and entrepreneurial abilities, keeping in view the changing requirements of the professional world.

The Orientation Programme helped the newly admitted students gain a clear understanding of the college's academic environment, curriculum, rules and regulations, available facilities, departmental functioning, and various academic and co-curricular activities. The students were warmly welcomed into the College of Community Science family, with the objective of ensuring that their first step into college life begins in a joyful, confident, and positive atmosphere.

The students were conveyed an inspiring message that their academic journey begins here and that they should build a bright future through the strength of knowledge, discipline, and skills. They were also extended best wishes for a successful and rewarding academic journey ahead.