वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था (PGIABM), चाकूर येथील १९ विद्यार्थी ‘‘अॅग्री-फूड इनोव्हेशन
अँड स्टार्टअप इकोसिस्टम - Agri-Food Innovation and Startup Ecosystem’ या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. हे
प्रशिक्षण दि. ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भारतीय कृषि अनुसंधान
परिषद–राष्ट्रीय कृषि संशोधन व्यवस्थापन अकादमी- ICAR–National Academy of
Agricultural Research Management (NAARM), हैदराबाद येथे आयोजित
करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना ही
महत्त्वपूर्ण शैक्षणिक व व्यावसायिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या
वतीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे आणि
विद्यार्थ्यांद्वारे आभार व्यक्त करण्यात आले.
कृषि व अन्न
क्षेत्रातील नवकल्पना,
स्टार्टअप निर्मिती, व्यवसाय मॉडेल, इनक्युबेशन तसेच निधी व गुंतवणुकीच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना या
प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. कृषि क्षेत्रातील आधुनिक
तंत्रज्ञान, उद्योजकता आणि नवोन्मेष यांचा व्यावसायिक
दृष्टिकोनातून अभ्यास करण्याची संधी विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणामुळे मिळणार
आहे.
या प्रशिक्षणामुळे
विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कौशल्यांना चालना मिळण्याबरोबरच कृषि-आधारित
व्यवसायाच्या संधी ओळखणे,
नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना विकसित करणे आणि स्टार्टअप
परिसंस्थेशी जोडले जाणे यासाठी मदत होणार आहे.
