वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या चाकूर (जि. लातूर) येथील
पदव्युत्तर कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद
साधत त्यांना यशाचा मंत्र दिला.
माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून
घेतल्या व त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचे येथील असे सांगितले. विद्यार्थी हा
संस्थेचा आत्मा आहे. तुम्ही नेहमी आनंदी, उत्साही
आणि सकारात्मक राहा,” असा सल्लाही त्यांनी दिला.
पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी ‘व्यवस्थापन’ या विषयाचे महत्त्व अधोरेखित
केले. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, त्याचे
प्रभावी व्यवस्थापन करणे हीच यशाची गुरूकिल्ली आहे, असे ते
म्हणाले. तसेच कृषि व्यवसाय व्यवस्थापनाच्या वाढत्या गरजेवर प्रकाश टाकत ‘सॉफ्ट
स्किल्स’चे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. संवाद कौशल्य, नेतृत्व, संघभावना आणि व्यक्तिमत्त्व विकास या
गुणांचा अंगीकार केल्यास यश सहज साध्य होऊ शकते, असे त्यांनी
स्पष्ट केले.
भेटीदरम्यान माननीय कुलगुरूंनी संस्थेतील वसतिगृहाच्या सुरू असलेल्या
नूतनीकरण कामाची सविस्तर पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण
असलेल्या या वसतिगृहाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. लवकरच
वसतिगृह पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
या वेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, सहाय्यक
प्राध्यापक डॉ. झिरमिरे, श्री. अभिषेक राठोड यांच्यासह
महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.



.jpeg)
.jpeg)
