Friday, April 3, 2026

वनामकृविच्या बायोमिक्स विक्रीत विक्रमी वाढ; शेतकऱ्यांमध्ये वाढती लोकप्रियता

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे बायोमिक्स संशोधन केंद्रास प्रभावी मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत बायोमिक्स संशोधन केंद्राने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली बायोमिक्स उत्पादनाच्या विक्रीत उल्लेखनीय वाढ साध्य केली आहे. या वाढीमुळे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नात लक्षणीय भर पडली असून शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीतही या उत्पादनाचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येत आहे.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार मराठवाड्यातील विद्यापीठाच्या अनेक कृषि महाविद्यालये तसेच संबंधित जिल्ह्यांतील संशोधन व विस्तार कार्यालयांमार्फत त्या–त्या जिल्ह्यासाठी शेतकरीप्रिय बायोमिक्स या उत्पादनाची विक्री करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचला असून परभणी येथे येऊन खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या प्रवास खर्चाचीही बचत झाली.

गेल्या चार वर्षांपासून बायोमिक्स उत्पादनाची मागणी व लोकप्रियता शेतकरी वर्गामध्ये सातत्याने वाढत आहे. विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही वाढ स्पष्टपणे दिसून येते. सन २०२२-२३ मध्ये सुमारे रुपये दोन कोटी तेवीस लाखांची विक्री झाली असून १३,८७८ शेतकऱ्यांपर्यंत हे उत्पादन पोहोचले. यामध्ये २१,८५८ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता.

सन २०२३-२४ मध्ये विक्रीत वाढ होऊन रुपये दोन कोटी  चोवीस लाखांपर्यंत पोहोचली. या कालावधीत २२,१२२ शेतकरी आणि २२,०१२ हेक्टर क्षेत्र यामध्ये समाविष्ट झाले.

सन २०२४-२५ मध्ये विक्रीत मोठी झेप घेत रुपये चार कोटी एकोनेंशी लाख इतकी विक्री नोंदविण्यात आली. यामध्ये ५२,६५२ शेतकरी आणि ६२,०४२ हेक्टर क्षेत्राचा समावेश होऊन उत्पादनवाढीस चालना मिळाली.

तर सन २०२५-२६ मध्ये विक्रमी रुपये सहा कोटी सेहचाळीस लाख इतकी विक्री झाली असून ६९,०७९ शेतकऱ्यांपर्यंत पोहोच साधण्यात आली. या माध्यमातून ७३,७५० हेक्टर क्षेत्रावर बायोमिक्स उत्पादनाचा प्रसार करण्यात आला.

बायोमिक्स हे विविध उपयुक्त जैविक घटकांचे मिश्रण असून ते पिकांवरील कीड व रोग नियंत्रण, उत्पादनवाढ आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या उत्पादनाच्या वापरामुळे रासायनिक कीटकनाशकांवरील खर्चात बचत होत असून पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळत आहे.

विद्यापीठाचे बायोमिक्स उत्पादन हे केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील शेतकऱ्यांमध्येही लोकप्रिय ठरत असून “शेतकरीप्रिय उत्पादन” म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे, असे बायोमिक्स संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सांगितले.

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय गोळेगाव येथे बायोमिक्स विक्री व्यवस्थेचा दिनांक ६ जुलै २०२४ रोजी माननीय कुलगुरूंच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला होता.


बायोमिक्स खरेदीसाठी शेतकरी शेतकऱ्यांची रांग 
बायोमिक्स खरेदीसाठी शेतकरी शेतकऱ्यांची रांग

Record Growth in Sales of VNMKV’s Biomix; Increasing Popularity Among Farmers

Hon'ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani Provides Effective Guidance to the Biomix Research Center

At Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, the Biomix Research Centre has achieved remarkable growth in the sales of Biomix products under the effective guidance of Honorable Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani. This increase has significantly contributed to the university’s revenue, while also playing an important role in enhancing farmers’ productivity.

As per the directives of the Honorable Vice-Chancellor, Biomix products (popular among farmers) were made available for sale through various agricultural colleges of the university across Marathwada, as well as through research and extension offices in respective districts. This initiative saved farmers’ time and reduced travel expenses that would otherwise have been incurred in visiting Parbhani for purchase.

Over the past four years, the demand and popularity of Biomix products have steadily increased among farmers. This growth is clearly reflected in the sales data:

* In 2022–23, sales reached approximately ₹2.23 crore, benefiting 13,878 farmers and covering 21,858 hectares of land.
* In 2023–24, sales increased to ₹2.24 crore, reaching 22,122 farmers and covering 22,012 hectares.
* In 2024–25, sales saw a major jump to ₹4.89 crore, with 52,652 farmers benefiting and coverage expanding to 62,042 hectares.
* In 2025–26, record sales of ₹6.46 crore were achieved, reaching 69,079 farmers and covering 73,750 hectares.

Biomix is a blend of various beneficial biological components that effectively help in pest and disease control, increase crop productivity, and improve soil fertility. Its use reduces dependency on chemical pesticides, thereby lowering costs and promoting environmentally sustainable farming practices.

The university’s Biomix product has gained popularity not only in Marathwada but across Maharashtra and even beyond the state. It has earned recognition as a “farmer-friendly product,” as stated by the Officer-in-Charge of the Biomix Research Centre, Dr. Chandrashekhar Ambadkar.