माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रभावी मार्गदर्शन
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणी अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या करिअर
घडविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पालवी ऍग्रो, पुणे
या नामांकित कृषी उद्योग संस्थेच्या वतीने दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी परीसर मुलाखत
(कॅम्पस इंटरव्ह्यू) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली, संचालक
शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांच्या निर्देशानुसार तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ.
विश्वनाथ खंदारे यांच्या पुढाकाराने पार पडला.
या निवड
प्रक्रियेसाठी पालवी ऍग्रो कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी महाविद्यालयात उपस्थित राहून
विद्यार्थ्यांची सखोल मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, संवाद
कौशल्य, नेतृत्व गुण तसेच उद्यानविद्या, आधुनिक शेती तंत्रज्ञान व कृषी व्यवसाय व्यवस्थापनातील ज्ञानाची कसून
पडताळणी करण्यात आली. विशेष म्हणजे, उद्योग क्षेत्राच्या
अपेक्षांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला.
या प्रक्रियेत एकूण
२७ पदवीधर व ०५ पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यापैकी २७
विद्यार्थ्यांची विविध पदांसाठी निवड होणे ही महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली
आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची तसेच महाविद्यालयातील उच्च दर्जाच्या
शिक्षण व प्रशिक्षणाची प्रचिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
निवड झालेल्या
विद्यार्थ्यांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी विशेष अभिनंदन करत
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना
उद्योग क्षेत्राशी थेट जोडण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांचा विकास
करण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कॅम्पस
प्लेसमेंट उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना
शिक्षणाबरोबरच व्यावहारिक अनुभव मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते स्पर्धात्मक
युगात सक्षमपणे उभे राहतात, असे नमूद केले.
प्लेसमेंट अधिकारी
डॉ. बी. एम. कलालबंडी व डॉ. आनंद दौंडे यांच्यासह डॉ. वैशाली भगत, डॉ.
अंशुल लोहकरे, डॉ. सचिन पव्हणे, डॉ.
सुबोध खंडागळे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, डॉ. आशा सातपुते, प्रा. शम्मा पठाण व इतर
प्राध्यापकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
या यशस्वी उपक्रमामुळे उद्यानविद्या महाविद्यालयाने उद्योग-शिक्षण दुवा अधिक बळकट करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.


.jpeg)