शेतीचा उत्पादन खर्च कमी करावा....मा. डॉ. भगवान आसेवार
अध्यक्षीय
भाषणात मा. डॉ. भगवान आसेवार यांनी विस्तार
शिक्षण संचालक यांनी शेतीमध्ये शक्यतो कमी खर्चाच्या आणि घरच्या निविष्ठा वापरून शेतीचा उत्पादन खर्च कमी
करावा तसेच हवामान बदलानुसार शेती उत्पादन घेण्याचा सल्ला दिला. तदनंतर मुख्य
विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याची
आणि रावे उपक्रमाची माहिती दिली. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषि विद्यावेता डॉ.
गजानन गडदे कापूस, सोयाबीन आणि हळद
सद्यस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत आणि कापुस उत्पादन वाढीसाठी गळफांदी
कापणे तसेच झाडाची अतीरीक्त वाढ रोखण्यासाठी वाढ प्रतिबंधक रसायनाची फवारणी घ्यावी
व तण आणि खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच हळद व विविध पिकामध्ये
विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स व ट्रायकोडर्माचा वापर व हुमणीचे व्यवस्थापन या विषयी
माहिती दिली. यानंतर कीटक शास्त्रज्ञ डॉ.
दिगंबर पटाईत कापूस, सोयाबीन आणि हळद यावरील कीड आणि रोग नियंत्रण माहिती सांगितली
तसेच कापुस व सोयाबिन पिकावरील प्रमुख कीडींचे व विविध लेबलक्लेम कीटकनाशकांचा
योग्य प्रमाणात वापराबाबत तसेच सोयाबीन मधील विषाणुजन्य यलो मोझॅकचे व्यवस्थापन
कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच डॉ. प्रवीण राठोड यांनी माती
परीक्षणाचे महत्व विशद केले आणि डॉ. राहुल भालेराव यांनी हळद व फळबाग व्यवस्थापन याबाबत
मार्गदर्शक केले. शेवटी प्रगतशील शेतकरी श्री विकास सोळुंके यांनी आपल्या या कार्यक्रमाविषयी
प्रतिक्रिया देवून समाधान व्यक्त केले.
यावेळी
जिल्हा परिषेद शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच
शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविका
रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी तर आभार डॉ. डी. एच. सारंग यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रांचालन रावे विद्यार्थी नितिन जाधव व हृषिकेश सावळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लिंगी येथील रावेचे सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम
घेतले. कार्यक्रमामध्ये रावेचे लिंगी, तेलगाव, हट्टा येथील सर्व विद्यार्थ्यांनी आणि
लिंगी गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.