महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत परळी वैद्यनाथ (बीड) येथे “परळी वैद्यनाथ
राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४”
आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २१ ऑगस्ट रोजी करण्यात आलेले आहे. या
महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी
उत्पादक कंपन्या, इत्यादींची उत्पादित वस्तू , खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्व. पंडीतअण्णा
मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीतील ४०० हून अधिक दालनात करण्यात आलेले
आहे. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले संशोधन यांची देखील
माहिती महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. या महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी
चर्चासत्रांचे आयोजन केलेले आहे. यामध्ये शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्ती शेतकऱ्यांशी सुसंवाद
साधत आहेत तसेच रानभाजी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. या कृषी
महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रदर्शनाचा
कालावधी एक दिवस वाढवण्यात येत आहे. त्यामुळे कृषी महोत्सवाचा समारोप दिनांक २५ ऑगस्ट
ऐवजी २६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
कृपया सर्व
शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र
राज्याचे कृषि मंत्री माननीय ना. श्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील तमाम शेतकरी
बांधवांना केलेले आहे.
परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवात विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रदर्शनासाठी वाढीव एक दिवस मिळाल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांनी या संधीचा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लाभ घेवून प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अधिकाधिक मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या