Wednesday, August 14, 2024

ब्राह्मणगाव येथे कृषी कन्या मार्फत खरीप शेतकरी मेळावा संपन्न....

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयात पदविच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी  ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ब्राह्मणगाव  ता. जि. परभणी येथे खरीप शेतकरी मेळाव्याचे दिनांक १४ ऑगस्ट रोजी आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी  सरपंच श्री. दगडुजी काळदाते हे होते. कार्यक्रमासाठी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, रावे समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, उपसरपंच श्री. ज्ञानेश्वर काळदाते आणि प्रगतशिल शेतकरी श्री. मधुकर काळदाते,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात सहयोगी अधिष्ठाता डॉ.सय्यद इस्माईल यांनी मृदा संरक्षण आणि माती परीक्षण चे कृषी क्षेत्रातील महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी तीन हजारांवर विद्यार्थी या उपक्रमा अंतर्गत शेतक-यांशी जोडले गेले असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषी दुत व कृषी कन्या म्हणून उत्कृष्ट कार्य करीत आहेत असे नमूद केले.

अध्यक्षिय समारोपात सरपंच श्री. दगडुजी काळदाते यांनी ब्राम्हणगाव विद्यार्थिनींसाठी जवळ असल्याने मागिल पाच वर्षापासुन दरवर्षी वेगवेगळ्या कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या गावात येत असल्याचे नमुद करुन या वर्षीच्या कृषी कन्यांनी गावात भरीव कार्य करुन चांगले योगदान दिले असल्याचे सांगितले तसेच महाविद्यालयाने कृषी कन्यांनी गावात केलेल्या योगदानाची योग्य दखल घ्यावी अशी विनंती केली.  

या प्रसंगी डॉ.संदिप बडगुजर यांनी सोयाबीन वरील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रण, डॉ. अनंत लाड यांनी खरीपामधील कापुस, सोयाबीन, मुग, उडिद इत्यादी पिकांवरील किड नियंत्रण आणि डॉ. आनंद दौंडे यांनी केळी आणि भाजीपाला पिकांवरील विषाणूजन्य रोग नियंत्रण या बाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले. शेवटी ब्राम्हणगावातील प्रगतिशील शेतकरी श्री.आकाश काळदाते आणि श्री. विठ्ठ्ल काळदाते यांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्राचार्यांचे आभार मानले आणि कृषी कन्यांनी ग्राम स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले.

मेळाव्याचे सुत्रसंचलन कृषी कन्या शुभांगी राऊत आणि श्रुती येरावाड यांनी केले तर आभार कृषी कन्या प्रांजल रेगुलवाड आणि शुभांगी थिटे यांनी मानले. मेळावयाचे नियोजन रावे केंद्र प्रमुख डॉ.आंनद दौंडे, कार्यक्रम अधिकारी (ब्राह्मणगाव) डॉ.महेश दडके व कार्यक्रम अधिकारी (ब्रम्हपुरी) डॉ. दिलीप झाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणगाव आणि ब्रम्हपुरी  येथील कृषी कन्यानी केले.  

या कृषी कन्यामध्ये सरीता सावंत, स्नेहल शिराळे, दिपाली सोनावळे, सोनाली शिंदे, पुर्वा शिंदे, मनिषा शिंदे, आरती सुर्यवंशी, निता रुद्राक्ष, प्रांजल रेगुलवाड, शुभांगी राऊतदिपाली राऊत, सुहर्षा वसमतकर, ज्ञानेश्वरी गाडगे, मिताली पवार, पुष्पा रसाळ, प्रियांका गोंडगे, ओजस्वी गडांबे, डिंपल राऊत, ॠतुजा नकाते, श्रुती येरावाड, पल्लवी वराडे, वैष्णवी तिडके, शितल ठोंबरे, जयश्री शिंगणे,शुभांगी थिटे आणि प्रांजली थिटे आणि ब्रम्हपुरी गावातील कृषी कन्या साक्षी नाईकवाडी, श्रुती मोहिते, साक्षी लाड, प्रीती लोणकर, मनीषा मखमले , आकांक्षा मस्के, दर्शना मात्रें, धनश्री मोरे, अंबिका मुखरे, प्रीती नाईक,  ममता पांचाळ, पायल पाटणकर, गीता पवार, पूजा पिठले, विद्या नाईकवाडे आणि उर्मिला लोंढे या कृषी कन्यांचा समावेश होता.