कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखालील वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक मुख्य आकर्षण
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत परळी वैद्यनाथ (बीड) येथे “परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४” आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २१ ऑगस्ट रोजी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री.एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते
आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा.
ना.श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या विशेष उपस्थितीत तसेच महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी राज्याचे कृषि मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे हे होते. सदर
महोत्सवानिमित्त आयोजित स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत राज्यातील
चारही कृषि विद्यापीठे आणि खासगी कंपन्या यांच्या कृषि तंत्रज्ञान आधारीत ४००
पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाने या महोत्सवातील
प्रदर्शनामध्ये कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी तेरा दालने उभारली आहेत. या दालनांना
शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद देत असून यामध्ये कृषी यंत्र व शक्ती विभागाच्या डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषी यंत्र व
शक्ती यांचे भव्य असे यंत्राचे दालन उभारले आहे. या दलानामध्ये ड्रोनद्वारे
फवारणी प्रात्यक्षिक ड्रोन पायलट
सातत्याने दाखवीत असून परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवातील हे एक मुख्य आकर्षण ठरले आहे. या प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांची आणि
विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी
द्वारे कृषि क्षेत्रात शेतकऱ्यांना फवारणी वरील खर्च व वेळ वाचवावा याकरीता
ड्रोनचा वापर करून विविध पिकातील किडव्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन यासाठी भाडेतत्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत व त्याची
निगरणी व दुरूस्त तसेच शेतकरी युवा पिढीस स्मार्ट व प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर
करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मीती करता यावी या दृष्टीकोनातुन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वॉव
गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) संस्थाचे संचालक श्री. शंकर गोयंका यांच्या सोबत
सामंजस्य करार करण्यात आलेला आहे आणि या करारामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ परभणी व वॉव गो ग्रीन कृषि
विमान (ड्रोन) यांचे संयुक्त विदयमाने कृषी क्षेत्रात भाडेतत्वावर फवारणी करीता
ड्रोनची उपलब्धतता माफक दारात करून देण्यात आली आहे. त्याबाबतीत शेतकऱ्यांना
जास्तीत जास्त माहिती व्हावी म्हणून महोत्सवात सतत प्रात्यक्षिके सुरु असून
त्याबाबतीत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
याबरोबरच महोत्सवात विद्यापीठाने मराठवाड्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शने आयोजित केले आहेत. यात दिनांक २२ ऑगस्ट रोजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे. डॉ. कैलास डाखोरे, डॉ. स्मिता सोलंकी यांनी केलेल्या मार्गदर्शनास तसेच प्रदर्शन दालनास भेटी देवून राज्यातील शेतकरी बांधव व कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्तारक यांनी मोठया संख्येने सहभागी प्रमाणात भेट देवून उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.