Monday, August 19, 2024

केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत वनामकृवि आणि माफसु यांच्यात सामंजस्य करार

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV) आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसु - MAFSU) यांच्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. सदरील करार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय दुग्ध संघ (पश्चिम विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने "दुग्धव्यवसाय: उपजीविका, आरोग्य आणि पोषणासाठी एक साधन" या विषयावर राष्ट्रीय परिषद दिनांक  १७ आणि १८ ऑगस्ट रोजी दरम्यान महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसु - MAFSU), नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरीजी हे होते. या उद्घाटन समारंभात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी सहभागी होवून तांत्रिक सत्रामध्ये पॅनेल सदस्य म्हणून योगदान दिले.

वनामकृवि आणि माफसु यांच्यातील सामंजस्य करार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा. डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते स्वाक्षरीत करण्यात आला. या कराराचा उद्देश शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, नवीन शैक्षणिक धोरण अवलंबन, कौशल्य विकास, मानव संसाधन विकास आणि उद्योजकतेच्या संधी वाढविण्यासाठी सहकार्य मजबूत करणे हा आहे.