मान्यवरांच्या शुभहस्ते वनामकृविच्या शास्त्रज्ञानी लिखित ‘एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन
कृषि मंत्री माननीय ना. श्री. धनंजय मुंडे महोदयांच्या शुभहस्ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन
महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि
महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने शेती विकासासाठी विविध पिकांचे
संकरीत तसेच सरळ वाण, आधुनिक लागवड पद्धती, अवजारे, मृद आणि जलसंधारणाचे
तंत्रज्ञान, पशुधनमधील संकरीत जातींची पैदास, विविध पिकावरील काढणी पश्चात
प्रक्रिया, साठवणूक, विक्री व्यस्थापन आदी बाबीवर संशोधन केलेले आहे. हे संशोधन
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत परळी वैद्यनाथ (बीड) येथे “परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४” आयोजन
करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री मा.
ना. श्री.एकनाथ शिंदे यांच्या
शुभहस्ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना.श्री. शिवराजसिंह चौहान
यांच्या विशेष उपस्थितीत तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मा.
ना. श्री. अजित पवार यांच्या
प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषि
मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे हे होते. या राज्यस्तरीय कृषी
महोत्सवाचे आयोजन
कृषी विभागाच्या पुढाकाराने करण्यात
आले. सदर महोत्सवानिमित्त
आयोजित स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत राज्यातील चारही कृषि
विद्यापीठे आणि खासगी कंपन्या यांच्या कृषि तंत्रज्ञान आधारीत ४०० पेक्षा जास्त
दालनाचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र,
कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा ना श्री पाशा पटेल, विधान परिषद सदस्य मा श्री
विक्रम काळे, विधान परिषद सदस्य मा श्रीमती पंकजा मुंडे, विधानसभा सदस्य मा श्री
प्रकाश सोळंके, विधानसभा सदस्य मा श्रीमती नमिता मुंदडा, विधानसभा सदस्य मा श्री
बाळासाहेब आजबे, माजी आमदार श्री सुरेश धस, माजी आमदार श्री आर टी जिजा
देशमुख, पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विकास
विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा श्री राजेशकुमार (भाप्रसे), कृषी विभागाचे सचिव मा श्रीमती
जयश्री भोज (भाप्रसे), आयुक्त (कृषी) मा श्री रवींद्र बिनवडे (भाप्रसे), कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख, आयुक्त (पशुसंवर्धन)
मा श्री कौस्तुभ दिवेगावकर (भाप्रसे), छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मा श्री
दिलीप गावडे (भाप्रसे), बीडचे जिल्हाधिकारी मा. श्री अविनाश पाठक (भाप्रसे), जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती संगीतादेवी पाटील, बीडचे पोलीस
अधीक्षक मा श्री अविनाश बारगळ (भापोसे), नादेकृसंचे
मा श्री परिमल सिंह, स्मार्टचे मा डॉ. हेमंत वसेकर, महाबीजचे मा श्री सचिन कलंत्रे, मकृउविम
मर्यादितचे मा डॉ मंगेश गोंदवले, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ
अभियंता श्री दीपक कशाळकर, विभागीय कृषी सहसंचालक मा श्री साहेबराव दिवेकर
(लातूर), डॉ तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री सुभाष
साळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच हा महोत्सवाच्या नियोजनात श्री
वाल्मिकअण्णा कराड यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात
मान्यवरांचे स्वागत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन
केंद्राद्वारे विकसित देशी कापसाच्या रुईपासून बनविलेल्या उपरणे देवून करण्यात
आले. सदरील उपरणे हे अतिशय तलम आणि आकर्षक असून वर्धा येथील ग्राम सेवा
समितीद्वारे तयार करण्यात येत आहेत. या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होत असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग आहे.
त्या अनुषंगाने माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके
यांनी संपूर्ण पाच दिवसाचे नियोजन केले.
विद्यापीठाने या
महोत्सवातील प्रदर्शनामध्ये तेरा दालने उभारली असून
माननीय कृषि
मंत्री मा. ना. श्री. धनंजय मुंडे यांनी वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनाचे उद्घाटन केले आणि प्रत्येक दालनास भेट देऊन विद्यापीठ विकसित विविध कृषि तंत्रज्ञानाची माहिती
घेतली. यावेळी त्यांनी कृषी विद्यापीठ विकसित संशोधनाबाबत समाधान व्यक्त करून हे संशोधन
शास्वत शेतीसाठी अतंत्य उपयुक्त असून त्याचे पूर्णतः अवलंबन होणे आवश्यक आहे
म्हणून हे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहोचणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच या दालनास आयुक्त (कृषी) मा श्री रवींद्र बिनवडे (भाप्रसे) कुलगुरू (वनामकृवि, परभणी) मा डॉ इन्द्र मणि, कुलगुरू (डॉपंदेकृवि, अकोला) मा डॉ शरद गडाख, बीडचे
जिल्हाधिकारी मा. श्री अविनाश पाठक (भाप्रसे) यांनीही पाहणी केली.
उद्घाटन समारंभात कुलगुरू मा डॉ इन्द्र
मणि यांचा मार्गदर्शनाखाली डॉ. अनंत लाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. बसवराज भेदे,
डॉ. राजरतन खंदारे आणि डॉ. योगेश मात्रे लिखित पुस्तक ‘एकात्मिक कीड-रोग
व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महोत्सवातील प्रदर्शन दालनामध्ये विद्यापीठाचा शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यातील दृष्टी क्षेप, देशी कापूस, गळीत धान्य, तृणधान्य, कडधान्य यांचे तंत्रज्ञान, पीक पद्धती सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, हवामानाच्या सल्ल्याची माहिती, फळबाग व भाजीपाला तंत्रज्ञान, पीक संरक्षण आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, अन्न तंत्र प्रक्रिया उद्योग, महिलांसाठी उपयुक्त शेती अवजारे यांच्या माहितीची दालने उभारली आहेत. याबरोबरच कृषी अभियांत्रिकी विभागाच्या दालनात विद्यापीठाने विकसित केलेले कृषी अवजारे, सिंचन पद्धती, ड्रोन तंत्रज्ञान, अपारंपारिक ऊर्जा इत्यादी बाबतच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे तसेच मिल्क - सिल्क संकल्पनेला चालना देण्याच्या अनुषंगाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि रेशीमवर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या विभागाच्या दालनात जिवंत नमुने व तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले. सेंद्रिय शेती संबंधित जिवंत देखावा उभारण्यात आला असून महोत्सवालगतच्या ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. तसेच विद्यापीठ विकसित विविध प्रकाशन ठेवली आहेत. याबरोबरच विद्यापीठाने मराठवाड्यातील यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि शास्त्रज्ञांचे मार्गदर्शने आयोजित केले. या महोत्सवास राज्यातील शेतकरी बांधव व कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्तारक मोठया प्रमाणात भेट देवून उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.