वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागात संदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली ही प्रयोगशाळा मुख्यमंत्री संशोधन निधी द्वारे तयार करण्यात आली. स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून या प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते दिनांक १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. या प्रयोगशाळेद्वारे मराठवाड्यातील जमिनीचे नकाशे तयार करून शेतकऱ्यांना डिजिटल आरोग्य पत्रिका देण्यात येणार आहे, तसेच शाश्वत शेती करिता भौगोलिक माहिती प्रणाली आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार करून याद्वारे शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड करणे व योग्य त्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे शक्य होणार आहे. जेणेकरून शाश्वत उत्पादनाकरिता जमिनीचा शाश्वत उपयोग होणार आहे तसेच याप्रसंगी डिजिटल आरोग्य पत्रिकेचेही उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यापीठास देशभरातून भेटीसाठी आलेले मान्यवर पाहुणे, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ खिजर बेग, कुलसचिव डॉ संतोष वेणीकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ प्रवीण वैद्य व सर्व विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ पी एस नेहारकर, डॉ. अभिजीत काळपांडे, डॉ संदीप बडगुजर, उपविद्यापीठ अभियंता डॉ दयानंद टेकाळे, डॉ हरीश आवारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तसेच विद्यापीठ अभियंता कार्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.