विद्यापीठ विकासात ड्रायव्हर ते डायरेक्टर यांचे योगदान महत्त्वाचे….. मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याद्वारे कार्य करत आहे. या कार्याद्वारे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास तर संशोधनद्वारे विविध पिकांचे सरळ आणि संकरित वाण तसेच लागवड तंत्रज्ञान, अवजारे विकसित करून ते विस्तार कार्याद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोचविले जाऊन शेतकरी विकास साधण्यासाठी विद्यापीठाद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली जाते. या कार्यामध्ये विद्यापीठातील ड्रायव्हर पासून ते डायरेक्टर पर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे असते अशा भावना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त करून त्यांनी विद्यापीठ कार्यातील ड्रायव्हरच्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर जाऊन, तेथे कार्यरत असलेले ड्रायव्हर श्री अंकित काळे आणि श्री अंकुश काळे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव केला. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, मध्यवर्ती प्रक्षेत्र प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, वॉव गो ग्रीन कृषी विमान कंपनीचे संचालक डॉ. शंकर गोयंका आदी उपस्थित होते या गौरवाने ड्रायव्हर भारावून गेले होते व यामुळे उत्सहाने काम करण्यासाठी उर्जा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.