वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना जगातील सर्वात मोठी
बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था,
इंस्टिट्यूशन
ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), द्वारे
“प्रख्यात अभियंता पुरस्कार (इमीनन्ट इंजिनिअर आवार्ड)” छत्तीसगढ राज्याचे कृषी
मंत्री माननीय ना. श्री राम विचार नेताम यांच्या शुभहस्ते छत्तीसगढ येथील इंदिरा
गांधी कृषी विद्यापीठ,
येथे दिनांक २९-३० ऑगस्ट दरम्यान आयोजित "कृषी अभियांत्रिकी : ग्रामीण अर्थव्यवस्था
सुधारण्यासाठी शाश्वत विकासाची वाटचाल" या विषयावरील राष्ट्रीय कृषी अभियंता
अधिवेशन आणि राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. हा
पुरस्कार देणारी इंस्टिट्यूशन ऑफ
इंजिनियर्स (इंडिया), IEI ही
भारतातील अभियंत्यांची राष्ट्रीय संस्था असून जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था आहे. याचे
१५ अभियांत्रिकी शाखांमध्ये दहा लाखांहून अधिक सदस्य असून संस्थेची स्थापना १९२० मध्ये
कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाली होती आणि १९३५ मध्ये रॉयल
चार्टरद्वारे तिचा समावेश करण्यात आला होता. सध्या तिचे मुख्यालय ८ गोखले रोड, कोलकाता येथे आहे. या संस्थेने कुलगुरू
प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान
आणि उपलब्धींची दखल घेत दिला आहे.
कुलगुरू प्रा.(डॉ.)
इन्द्र मणि हे २५ जुलै २०२२ पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,
परभणी
(महाराष्ट्र) येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. याआधी,
त्यांनी
भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्था,
नवी
दिल्ली येथे उप संचालक (संशोधन), नैसर्गिक
संसाधन व्यवस्थापन शाळेचे समन्वयक, संरक्षित
शेती तंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून
काम केले आहे.
आपल्या ३० वर्षांपेक्षा
अधिक काळाच्या दीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत,
त्यांनी
कृषी अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू
शेती, भाजीपाला
यांत्रिकीकरण, लहान शेतातील
यांत्रिकीकरण आणि खतांचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपकरणांच्या विकासाच्या
क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विकसित आणि विस्तार केलेल्या
तंत्रज्ञानाचा प्रसार देशातील १९ पेक्षा जास्त राज्यांमध्ये झाला आहे. भारतीय
तंत्रज्ञान संस्था (IIT), कानपूर
यांच्या सहकार्याने त्यांनी डिझाइन इनोव्हेशन सेंटर स्थापन केले,
जे
नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान
संस्था, नवी दिल्लीच्या
ईशान्येकडील राज्यांतील (सर्व सात राज्ये),
टीएसपी
(मध्य प्रदेश) आणि एमजीएमजी (उत्तर प्रदेश,
हरियाणा,
दिल्ली)
कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगदान दिले आहे.
तसेच त्यांनी शेतकरी
केंद्रित यांत्रिकीकरण धोरणांचे समर्थन आणि विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली आहे. भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान
दिले आहे, ज्यासाठी त्यांनी
कृषीमध्ये ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP)
विकसित
करण्यासाठी समितीचे संयोजक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या,
ते
पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी,
ज्यात
नॅनो फॉर्म्युलेशनचा समावेश आहे, मानक
मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित
करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कृषी व शेतकरी कल्याण
मंत्रालय, भारत सरकारयांच्या
कार्यक्रमांतर्गत शेती तंत्रज्ञानाशी संबंधित नवकल्पक आणि स्टार्ट-अप्सच्या
मार्गदर्शनात सक्रियपणे भाग घेतला आहे. तसेच,
ते
कृषी पोषणासाठी तंत्रज्ञान नवोपक्रम मंच (TIFAN)
मध्ये सक्रियपणे सहभागी होते.
कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि या नवीन प्रख्यात अभियंता पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्यामुळे विद्यापीठात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले. या सन्मानाबद्दल विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ यांच्या सह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.