Saturday, August 10, 2024

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सेट परीक्षेत घवघवीत यश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने एप्रिल २०२४  मध्ये घेण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगा अंतर्गत महाराष्ट्र राज्य योग्यता चाचणी (सेट) परीक्षेत प्राची गट्टानी, सुषमा माने, नवाल चाऊस, रुणाली ढबाले, मोहिनी खरवडे, स्वाती पवारआणि श्याम कुरे यांनी  उत्कृष्ट गुण प्राप्त करून सेट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाची सेट परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवली. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण आणि या पैकी सहा विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण याच महाविद्यालयातून तर एका विद्यार्थ्यांनीनी हैदराबाद येथून  पूर्ण केले. या यशामुळे हे विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती होण्यास पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, विभाग प्रमुख डॉ. सुनिता काळे, डॉ. विजया पवार डॉ. जयश्री रोडगे, डॉ. शंकर पुरी तसेच या महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंदानी त्यांचे अभिनंदन केले आहे.