वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय परभणी
येथून पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेला विद्यार्थी मेघराज विश्वनाथ नाटकर (रा.
माजलगाव) याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र अराजपत्रित दुय्यम सेवा
मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यानिमित्त माननीय
कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्याहस्ते मेघराज याचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी
त्यांनी मेघराज यास भावी वाटचालीस
शुभेच्छा दिल्या. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल विद्यार्थी कल्याण
अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर आणि एनसीसी
ऑफिसर ले.डॉ. जयकुमार देशमुख उपस्थित होते. मेघराज याने पदवी मध्ये असताना एनसीसी
सी प्रमाणपत्र 'अ'
ग्रेड मध्ये मिळवले होते तसेच त्याने डेहराडून व केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय
छात्रसेना शिबिरामधे महाविद्यालयचे प्रतिनिधित्व केले होते. एनसीसी मुळेच वर्दीची
आवड निर्माण झाली होती व एक दिवस पोलिस अधिकारी व्हायचे असे ठरविले होते असे मनोगत
त्याने सत्कारप्रसंगी व्यक्त केले.
