Tuesday, August 13, 2024

वनामकृवितील एकशे एकतीस प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधीचा मुद्दा निकाली

 माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या पाठपुराव्यास यश


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जाहिरात दिनांक २६/०८/२००९ अन्वये विद्यापीठाच्या सेवेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून रुजू झालेल्या एकशे एकतीस कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी नियमित करण्यासाठीचा मुद्दा प्रलंबित होता. या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक १८/०४/२०२३ रोजीच्या निर्णयानुसार वैध ठरविण्यात आली आहे. यानुसार माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या कर्मचारी केंद्रित धोरणानुसार त्यांनी याबाबतीत शासना कडे मार्गदर्शनसाठी पत्र पाठवून  या १३१ कर्मचाऱ्यांच्या परिविक्षाधीन कालावधी नियमाकुल करण्यासाठी शासन स्तरावर चर्चा आणि  पाठपुरावा करून सदर कर्मचाऱ्यांचा मुद्दा योग्य पद्धतीने माननीय कुलगुरू यांनी मांडला. त्यांच्या या पाठपुराव्यास यश मिळाले आणि शासनाने कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधीनियमातील आवश्यक तरतुदींची काटेकोर पूर्तता करून घेऊन नियमाकुल करण्यासाठी मंजुरी दिली आहे. यास्तव माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त  करून  सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आणि विद्यापीठ प्रशासनाचे अभिनंदन केले तसेच त्यांनी विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले व यातून विद्यापीठाचे कार्य अधिक जोमाने आणि क्षमतेने करण्यासाठी बळ मिळाल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या.