Thursday, August 15, 2024

वनस्पती आरोग्य चिकित्सा प्रयोगशाळेचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील वनस्पती रोगशास्त्र विभागात मुख्यमंत्री संशोधन निधी अंतर्गत वनस्पती आरोग्य चिकित्सा प्रयोगशाळा उभारण्यात आली. स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून या अत्याधुनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्यात आले. ही प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या शेतातील विविध रोगांचे तात्काळ निदान होण्यासाठी उपयुक्त पडेल, तसेच ही प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक प्रयोगासाठी सुद्धा महत्वाची असून याद्वारे विद्यार्थांना त्यांचा संशोधनास या प्रयोगशाळाचा लाभ मिळेल अशा भावना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केल्या. यावेळी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक संशोधन डॉ खिजर बेग, कुलसचिव डॉ संतोष वेणीकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, सहयोगी  अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. संदीप बडगुजर व प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रशेखर अंबाडकर आणि वनस्पती रोगशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.