अन्न व औषध प्रशासन विभागाच्या "सण महाराष्ट्राचा –
संकल्प सुरक्षिततेचा" या अभियानांतर्गत, दिनांक १६ सप्टेंबर
२०२५ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्नतंत्र महाविद्यालयात भारतीय
खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या फूड सेफ्टी ऑन व्हिल्स या उपक्रमाद्वारे
अन्नभेसळ विषयक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेने तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली
राबविण्यात आला.
या उपक्रमानुसार अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याकरिता एफएसएसएआईने
विकसित केलेल्या सोप्या पद्धती महाविद्यालयाच्या पदवी पदवीत्तर व आचार्य
पदवी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले तसेच निरोगी जीवन जगण्यासाठी पोषक व सुरक्षित
अन्नाचे महत्त्व पटवून देण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना जंक फूड
सेवनाच्या दुष्परिणामाबद्दल ही जागृत करण्यात आले. सदर उपक्रम माननीय सह आयुक्त
(अन्न) छत्रपती संभाजी नगर विभाग श्री द. वि. पाटील, सहाय्यक आयुक्त (अन्न) परभणी
श्री अनंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्री अनिकेत भिसे
यांच्याद्वारे घेण्यात आले या उपक्रमात
छत्रपती संभाजी नगर स्थित अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चाचणी
प्रयोगशाळेचे तंत्रज्ञ श्री विजय नायबळ यांनी उपस्थितांसमोर दूध व दुग्धजन्य
अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याकरिता उपयुक्त
घरगुती सोप्या पद्धतींचे प्रात्यक्षिकांद्वारे सादरीकरण केले. सहाय्यक आयुक्त श्री अनंत चौधरी यांनी महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्यांशी संवाद साधला व असे सांगितले की सामान्यतः चहा व कॉफी भुकटी
खाद्यतेल तूप दूध व थंड पेय या अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते आणि निकृष्ट
दर्जाचे अन्नपदार्थ ग्राहकांना देणे हे सुद्धा एक प्रकारची अन्नभेसळच आहे. हा
उपक्रम सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व
विभाग प्रमुख, प्राध्यापक यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.सदरील
उपक्रमाला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.