अतिवृष्टीनंतर कापूस, सोयाबीन, तूर व हळद पिकांवरील विविध रोगांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत आणि श्री. एम. बी. मांडगे यांनी केले.
कपाशी मधील बोंडसड व्यवस्थापन
सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक
बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% -
500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) अधिक स्ट्रेप्टोमायसीन 40 ग्रॅम (2
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
(ॲग्रेस्को शिफारस)
बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग म्हणजेच बाह्य बोंडसड
रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 200 ग्रॅम (10 ग्रॅम
प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित
बुरशीनाशक)- 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा प्रोपीकोनॅझोल 25%
- 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% +
डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10
लिटर पाण्यात) किंवा प्रोपीनेब 70% - 500 ते 600 ग्रॅम (25 ते 30 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात) मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.
आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
सोयाबीन मधील शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन -
पावसाचा अंदाज घेऊन उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये *टेब्युकोनॅझोल
10%+ सल्फर 65% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150
ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा
पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3%+ इपिक्साकोनाझोल 5% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली
( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.
तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत
बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे
आळवणी करावी.
तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन
खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्थेरा रोग आहे. त्यासाठी 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात) मेटालॅक्झील एम 4 टक्के+ मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक)*
प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी.
किंवा
ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात
मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी व आळवणी करावी.
जमिनीत सततच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे
हा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो... अशा वातावरणात रोग आल्यानंतर फारसे नियंत्रण होत
नाही त्यामुळे येण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक स्वरूपात सर्वांनी वरील उपाययोजना
लवकरात लवकर कराव्यात.
हळदीमधील पानावरील ठिपके, करपा आणि
कंदकुज व्यवस्थापन
करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत
आणि शेतात स्वच्छता राखावी.
रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
प्रादुर्भाव कमी असल्यास
कार्बेडेंझीम 50% - 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात)
किंवा
मॅन्कोझेब 75% -500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी
करावी.
प्रादुर्भाव जास्त असल्यास
एजोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित
बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)किंवा
प्रोपीकोनॅझोल 25% - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा
क्लोरथॅलोनील 75% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात)
यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर
मिसळून फवारणी करावी.
हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी -
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून
जमिनीतून द्यावे.
जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा
करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.
कंदकूज झाली असल्यास जमिनीतून
कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा
मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)
किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात)
यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी
महिन्यातून एकदा आळवणी करावी.
(आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास
पाण्याचा थोडा ताण द्यावा.)
वरील सर्व उपाययोजना करण्यापूर्वी सर्व पिकातील शेतात
साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व मगच वरील उपाययोजना कराव्यात.
सर्व
पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी:-
कुठलीही
फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी
वरील
बुरशीनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके,
विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने
मिसळू नये.
लागोपाठ
एकच एक बुरशीनाशक फवारू नये.
फवारणी
करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच
वापरावे,
कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा
व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.
वनामकृवि संदेश क्रमांक: ०६/२०२५ ( २३ सप्टेंबर
२०२५)