देश, राज्य आणि विद्यापीठ हे शेतकरी केंद्रित
दृष्टिकोनातून कार्य करीत असून, शेतकऱ्यांच्या योगदानाचा
गौरव करण्याच्या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या
मार्गदर्शन व सूचनेनुसार शेतकऱ्यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम
सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार, वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने आयोजित २८ व्या
दीक्षांत समारंभात दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी मराठवाड्यातील २१ प्रगतिशील व
प्रयोगशील शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि मान्यवरांच्या शुभहस्ते
सन्मानित करण्यात आले. यामध्ये १५ शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार-२०२६’,
तर सहा शेतकऱ्यांना ‘नवोन्मेषी शेतकरी पुरस्कार-२०२६’ प्रदान
करण्यात आले. शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, कृषी
विकासातील योगदान, नाविन्यपूर्ण प्रयोग तसेच आधुनिक कृषी
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांची दखल घेऊन या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली.
‘शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कार-२०२६’ साठी १५
शेतकऱ्यांची निवड
या पुरस्कारासाठी
छाननी समितीने गुणवत्ताक्रमानुसार निवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये श्री. विजय गंगाधर
जंगले (पेडगाव,
ता. व जि. परभणी), श्री. रत्नाकर गंगाधर ढगे (सायाळ, ता. लोहा, जि. नांदेड), श्री. भारत बापूराव जाधव
(ताडपिंपळगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती
संभाजीनगर), श्री. अमृतराज भुजंगराव कदम (पूर्णा, जि. परभणी),
श्री. सागर राजेंद्र सोनवणे (ताडपिंपळगाव, ता. कन्नड,
जि. छत्रपती संभाजीनगर), श्री. मधुकर नामदेवराव घुगे (केहाळ,
ता. जिंतूर, जि. परभणी), श्री. दत्तात्रय
नामदेवराव कदम (धामदरी, ता. अर्धापूर, जि.
नांदेड), श्री. माऊली गोविंद जाधव (सातेफळ, ता. आंबेजोगाई,
जि. बीड), श्री. कपिलेश्वर शंकरराव सोनटक्के (भेंडेगाव, ता. वसमत, जि. हिंगोली), श्री. दादासाहेब दौलतराव
शिंदे (शिंदोन, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर), श्री. जयकिसन
रामदास शिंदे (वरुडी, ता. बदनापूर, जि.
जालना), श्री. भानुदास पुरुषाजी जंगाळ (मुरुंबा, ता. व जि.
परभणी), श्री. श्रीकृष्ण सदाशिव शिंदे (सुगाव, ता. चाकूर,
जि. लातूर), श्री. रामप्रसाद अशोक डोईफोडे (ईट, ता. व जि. बीड) आणि श्री. अशोक विठोबा शिरसाट (वाल्हा, ता. बदनापूर, जि. जालना) या प्रगतीशील शेतकऱ्यांचा
समावेश आहे.
‘नवोन्मेषी
शेतकरी पुरस्कार-२०२६’ साठी सहा शेतकऱ्यांची निवड
या पुरस्कारासाठी
निवड झालेल्या शेतकऱ्यांमध्ये श्री. बाबन विठ्ठलराव ढोबळे (असोला, ता.
औंढा, जि. हिंगोली), श्री. विश्वनाथ
भागोजी दहे (निराळा बाजार, छत्रपती संभाजीनगर), श्री. भीमराव सिद्धामअप्पा डोणगापूरे (रावळगाव, ता.
उदगीर, जि. लातूर), श्री. अविनाश
रुस्तुम मुंगल (इजळी, ता. मुदखेड, जि.
नांदेड), श्री. विश्वनाथ पंडितराव जायभाये (नगारवाडी,
पो. तळेगाव, ता. लोहा, जि.
नांदेड) आणि श्री. सोपान नारायणराव आरमळ (मांडवा, पो. झरी,
ता. व जि. परभणी) यांचा समावेश आहे.
शेतीमध्ये
नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून
शेती उत्पादन व उत्पादकता वाढीस हातभार लावणाऱ्या तसेच कृषी क्षेत्राच्या विकासात
उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने
विद्यापीठामार्फत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांमुळे प्रगतिशील
व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांनाही
आधुनिक व नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
For English
21 Farmers
from Marathwada Honoured at VNMKV’s 28th Convocation; 15 Conferred with ‘Farmer
Scientist’ Awards and 6 with ‘Innovative Farmer’ Awards
The Government
of India, the State Government and the University are working with a
farmer-centric approach, recognising the significant contribution of farmers to
agricultural development. With the guidance and initiative of Hon’ble Chief
Minister Shri Devendra Fadnavis
ji, a special initiative has been undertaken to recognise and honour
farmers for their outstanding contributions to the agriculture sector.
Accordingly, at
the 28th Convocation of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV),
Parbhani, held on 20 November 2026, a total of 21 progressive and innovative
farmers from the Marathwada region were felicitated by Hon’ble Vice-Chancellor
Prof. (Dr.) Indra Mani and other dignitaries. Of these, 15 farmers received the
‘Farmer Scientist Award–2026’, while six farmers were conferred with the
‘Innovative Farmer Award–2026’.
The awardees
were selected in recognition of their outstanding work in agriculture,
contribution to agricultural development, innovative farming practices and
effective adoption of modern agricultural technologies.
Fifteen Farmers Selected for
the ‘Farmer Scientist Award–2026’
The farmers
selected for this award by the scrutiny committee on the basis of merit ranking
include:
1. Shri
Vijay Gangadhar Jangale (Pedgaon, Tq. and Dist. Parbhani)
2. Shri
Ratnakar Gangadhar Dhage (Sayal, Tq. Loha, Dist. Nanded)
3. Shri
Bharat Bapurao Jadhav (Tadpimpalgaon, Tq. Kannad, Dist. Chhatrapati
Sambhajinagar)
4. Shri
Amrutraj Bhujangrao Kadam (Purna, Dist. Parbhani)
5. Shri
Sagar Rajendra Sonawane (Tadpimpalgaon, Tq. Kannad, Dist. Chhatrapati Sambhajinagar)
6. Shri
Madhukar Namdevrao Ghuge (Kehal, Tq. Jintur, Dist. Parbhani)
7. Shri
Dattatraya Namdevrao Kadam (Dhamdari, Tq. Ardhapur, Dist. Nanded)
8. Shri
Mauli Govind Jadhav (Satephal, Tq. Ambajogai, Dist. Beed)
9. Shri
Kapileshwar Shankarrao Sontakke (Bhendegaon, Tq. Basmat, Dist. Hingoli)
10. Shri
Dadasaheb Daulatarao Shinde (Shindon, Tq. and Dist. Chhatrapati Sambhajinagar)
11. Shri
Jaykisan Ramdas Shinde (Varudi, Tq. Badnapur, Dist. Jalna)
12. Shri
Bhanudas Purushaji Jangal (Murumba, Tq. and Dist. Parbhani)
13. Shri
Shrikrishna Sadashiv Shinde (Sugav, Tq. Chakur, Dist. Latur)
14. Shri
Ramprasad Ashok Doiphode (Eet, Tq. and Dist. Beed)
15. Shri Ashok
Vithoba Shirsat (Walha, Tq. Badnapur, Dist. Jalna)
Six Farmers
Selected for the ‘Innovative Farmer Award–2026’
The farmers
selected for the ‘Innovative Farmer Award–2026’ include:
1. Shri
Baban Vithalrao Dhoble (Asola, Tq. Aundha, Dist. Hingoli)
2. Shri
Vishwanath Bhagoji Dahe (Nirala Bazar, Chhatrapati Sambhajinagar)
3. Shri
Bhimrao Siddamappa Dongapure (Ravalgaon, Tq. Udgir, Dist. Latur)
4. Shri
Avinash Rustum Mungul (Ijli, Tq. Mudkhed, Dist. Nanded)
5. Shri
Vishwanath Panditrao Jaybhaye (Nagarwadi, Post Talegaon, Tq. Loha, Dist.
Nanded)
6. Shri
Sopan Narayanrao Armal (Mandava, Post Zari, Tq. and Dist. Parbhani)
The University
confers these awards to recognise and appreciate farmers who undertake
innovative agricultural experiments, effectively adopt modern technologies to
enhance agricultural production and productivity, and make significant
contributions to the development of the agricultural sector.
These awards are expected to encourage the efforts of progressive and innovative farmers and inspire others to adopt modern, innovative and improved agricultural technologies, thereby contributing to the overall growth and development of agriculture.


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)