Friday, November 20, 2026

वनामकृविच्या २८ व्या दीक्षांत समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके, रौप्यपदके, रोख पारितोषिके व गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान

पदवी, पदव्युत्तर तसेच आचार्य अभ्यासक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक गुणवत्तेला विद्यापीठाकडून प्रोत्साहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या २८ व्या दीक्षांत समारंभात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पदवी, पदव्युत्तर तसेच आचार्य (पीएच.डी.) अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक गुणवत्ता संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विविध सुवर्णपदके, रौप्यपदक, रोख पारितोषिके आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे प्रदान करून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. निर्धारित कालावधीत कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण न होता विशेष प्रावीण्यासह पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली.

या समारंभात एकूण ६३ पदके व पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाची १४ सुवर्णपदके, दात्यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारी १४ सुवर्णपदके, एक रौप्यपदक, नऊ रोख पारितोषिके आणि २५ पदव्युत्तर पदवी गुणवत्ता प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये कृषि, अन्न तंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी, सामुदायिक विज्ञान, उद्यानविद्या, जैवतंत्रज्ञान आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन या शाखांतील विद्यार्थ्यांना विद्यापीठ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये योगिता उगले (कृषि), आदिती सिरसाठ (अन्न तंत्रज्ञान), अंशिका राऊत (कृषि अभियांत्रिकी), फातिमा शेख (सामुदायिक विज्ञान), नेहला जस्मिन (उद्यानविद्या), शांजना के. पी. (जैवतंत्रज्ञान) आणि रूपनवर विशाखा (कृषि व्यवसाय व्यवस्थापन) यांचा समावेश आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये कृषि, कृषि अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, उद्यानविद्या आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन या शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यापीठ सुवर्णपदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये चंदना वंगूरू (एम.एस्सी. कृषि), श्रावणी लोमटे (एम.टेक. अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान), सोनिया श्री पी. (एम.टेक. कृषि अभियांत्रिकी), पद्मश्री उग्गिना (एम.एस्सी. सामुदायिक विज्ञान), गीता एम. (एम.एस्सी. उद्यानविद्या), निकिता हिवाळे ( एम. एससी. - आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान  MBB) आणि मयुरी सलमोठे (एमबीए-एबीएम) यांचा समावेश आहे.

याशिवाय पीएच.डी. अभ्यासक्रमामध्ये कीटकशास्त्र विषयात ऐश्वर्या संजय काळे (८.९० सीजीपीए), अनुवंशशास्त्र व वनस्पती प्रजनन विषयात कृष्णा बालासाहेब गवई (८.४८ सीजीपीए) आणि कृषिविद्या विषयात शिंदे प्रिया पंजाबराव यांची सुवर्णपदकासाठी निवड करण्यात आली आहे.

तसेच पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमांतील विविध विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना  दाता व्यक्तींच्या व संस्थांच्या नावे सुवर्णपदके आणि रौप्यपदके प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये चंदना वंगूरू, सुभाष कुमार,  लोकेश जांभुळकर, अनबरासू आर., अंकिता जी. एस. आणि ब्युटी दाई या विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उल्लेखनीय शैक्षणिक गुणवत्ता संपादन केली आहे. तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये आदिती सिरसाठ (अन्न तंत्रज्ञान), बचुटे कल्याणी (कृषि), अंकिता राऊत  (कृषि अभियांत्रिकी) यांचा समावेश आहे.

पदवी अभ्यासक्रमांमध्ये सामुदायिक विज्ञान शाखेतील वैरागर सरस्वती कैलास, कृषि अभियांत्रिकी शाखेतील अंशिका राऊत आणि जैवतंत्रज्ञान शाखेतील शांजना के. पी. यांना दात्यांच्या व्यक्तींच्या नावे रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ब्युटी दाई, अनबरासू आर., गोवर्धन एन. एस. आणि पद्मश्री उग्गिना यांना विविध विषयांतील रोख पारितोषिकांसाठी पात्र ठरविण्यात आले आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील विविध विषयांमध्ये प्रथम क्रमांक व विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये कृषिशास्त्र, अनुवंशशास्त्र व वनस्पती प्रजनन, वनस्पती शरीरक्रियाशास्त्र, बीजशास्त्र व तंत्रज्ञान, कृषि अर्थशास्त्र, कृषि विस्तार शिक्षण, पशुधन उत्पादन व्यवस्थापन, दुग्धशास्त्र, कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, मृदाशास्त्र, कृषि हवामानशास्त्र, आण्विक जीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान, कृषि अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, उद्यानविद्या आणि कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयांचा एकूण २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यापीठाच्या या पुरस्कारांमधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्याबरोबरच संशोधन, ज्ञानार्जन आणि कृषि व संलग्न क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीस प्रोत्साहन मिळणार आहे. सदर सर्व पुरस्कार व प्रमाणपत्रे विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आली.
























For English

Meritorious Students Honoured with Gold Medals, Silver Medals, Cash Prizes and Merit Certificates at the 28th Convocation of VNMKV

 

Outstanding Academic Achievers from Undergraduate, Postgraduate and Doctoral Programmes Recognised; University Encourages Academic Excellence

 

At the 28th Convocation of Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Parbhani, meritorious students who demonstrated outstanding academic performance during the academic year 2025–26 in undergraduate, postgraduate and doctoral (Ph.D.) programmes were honoured with various gold medals, silver medals, cash prizes and merit certificates. The awards were presented at the hands of Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani and other dignitaries. Students who successfully completed their degree programmes with distinction within the prescribed duration, without failing in any subject, were also considered eligible for these awards.

A total of 63 medals and awards were distributed during the convocation. These included 14 university gold medals, 14 donor-sponsored gold medals, one silver medal, nine cash prizes and 25 postgraduate degree merit certificates.

In the undergraduate programmes, university gold medals were awarded to meritorious students from the disciplines of Agriculture, Food Technology, Agricultural Engineering, Community Science, Horticulture, Biotechnology and Agricultural Business Management. The awardees included Yogita Ugale (Agriculture), Aditi Sirsath (Food Technology), Anshika Raut (Agricultural Engineering), Fatima Shaikh (Community Science), Nehla Jasmin (Horticulture), Shanjana K. P. (Biotechnology) and Roopnavar Vishakha (Agricultural Business Management).

Similarly, university gold medals were awarded to outstanding students from postgraduate programmes in Agriculture, Agricultural Engineering, Food Processing Technology, Community Science, Horticulture and Agricultural Business Management. The recipients included Chandana Vanguru (M.Sc. Agriculture), Shravani Lomte (M.Tech. Food Processing Technology), Sonia Shri P. (M.Tech. Agricultural Engineering), Padmashree Uggina (M.Sc. Community Science), Geetha M. (M.Sc. Horticulture), Nikita Hivale (M.Sc. Molecular Biology and Biotechnology – MBB) and Mayuri Salmothe (MBA-ABM).

In the Ph.D. programme, Aishwarya Sanjay Kale (8.90 CGPA) in Entomology, Krishna Balasaheb Gawai (8.48 CGPA) in Genetics and Plant Breeding, and Shinde Priya Punjabrao in Agronomy were selected for gold medals in their respective disciplines.

In addition, gold and silver medals instituted in the names of individual donors and organisations were awarded to students who demonstrated exceptional academic excellence in various subjects of postgraduate Agriculture programmes. The meritorious students included Chandana Vanguru, Subhash Kumar, Lokesh Jambhulkar, Anbarasu R., Ankita G. S. and Beauty Dai. Among the undergraduate students, Aditi Sirsath (Food Technology), Bachute Kalyani (Agriculture) and Ankita Raut (Agricultural Engineering) were also selected for donor-sponsored medals.

Cash prizes instituted in the names of individual donors were awarded to Vairagar Saraswati Kailas from Community Science, Anshika Raut from Agricultural Engineering and Shanjana K. P. from Biotechnology at the undergraduate level. At the postgraduate level, Beauty Dai, Anbarasu R., Govardhan N. S. and Padmashree Uggina were selected for cash prizes in various disciplines.

Furthermore, merit certificates were awarded to postgraduate students securing first rank and demonstrating outstanding academic performance in their respective subjects. A total of 25 students from disciplines including Agronomy, Genetics and Plant Breeding, Plant Physiology, Seed Science and Technology, Agricultural Economics, Agricultural Extension Education, Livestock Production Management, Dairy Science, Entomology, Plant Pathology, Soil Science, Agricultural Meteorology, Molecular Biology and Biotechnology, Agricultural Engineering, Food Processing Technology, Community Science, Horticulture and Agricultural Business Management were recognised.

Through these awards, the University has not only recognised the academic achievements of its students but has also encouraged excellence in research, learning and overall performance in agriculture and allied sectors. All these awards and certificates were presented during the University's 28th Convocation.