वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - कृषिक्षेत्रात पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्पांतर्गत शेतकरी व महिलांसाठी दिनांक ११ मार्च रोजी ‘तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल रामटेके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन परभणी जिल्हा उद्योग केंद्राचे संचालक श्री. बाळासाहेब झिंजाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार लोखंडे, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. आर. कांबळे, आयोजक संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. मदन पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात डॉ राहुल रामटेके म्हणाले की, शेतकरी महिलांनी बचत गटामार्फत एकत्रित होऊन कृषी पुरक लघु उद्योग करावते. महिलांनी शेतमालाचे मुल्यवर्धन व प्रक्रिया उद्योग करुन उद्योजक होणे काळाची गरज आहे. गृहींणींनी लघुउद्योगामार्फत लोणचे, चटणी, शेवया, पापड्या, खारोड्या आदी पदार्थ गृहउद्योगामार्फत तयार करुन कौटुंबीक उत्पन्न वाढवण्यास हातभार लावावा असे प्रतिपादन केले.
भाषणात श्री. विजयकुमार लोखंडे यांनी मेळाव्यातील मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा लाभ घेवून कृषी विभागाच्या योजनांची मदत घेऊन महिलांनी सक्षम होण्याचे आवाहन केले तर डॉ. के. आर. कांबळे यांनी शेतकरी महिलांनी ज्वारी सारख्या पिकांच्या प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. मदन पेंडके यांनी महिलांना कुपनलीकेद्वारे पुनर्भरण त्या विषयी माहिती दिली तसेच शेतीपुरक उद्योगधंदे जसे की शेळीपालन, कुकुटपालन या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक, महिला गृह उद्योग व बचत गटासाठी पापड मशीन, शेवई मशिन, मिरची कांडप, दाल मिल, पिठ गीरणी, तेलघाणी इत्यादी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवुन त्याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख अपारंपारीक उर्जा विभाग यांनी सौर वाळवणी प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन केले व विविध प्रकारच्या सोलार ड्रायर मध्ये मेथी, कांदे, कारले, वांगी इत्यादी वाळवून प्रात्यक्षिकासह दाखवले.
सुत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले तर डॉ. संदेश देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्तीतेसाठी इंजि. अजय वाघमारे, श्री. दिपक यंदे, श्री. भरत खटींग, श्री. रुपेश काकडे, श्री. कृष्णकुमार बिलवरे, श्रीमती सरस्वती पवार आदींनी परिश्रम घेतले. सदरील मेळाव्यास १५० पेक्षा जास्त शेतकरी महिला व पुरुष यांनी सहभाग नोंदवला.