Tuesday, March 8, 2022

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे हे होते तर कृषि विद्या विभागाच्या डॉ.सुनीता पवार, श्रीमती मंगला गडदे, आत्मा विभागाच्या श्रीमती स्वाती घोडके, कृषि विभागातील श्रीमती वंदना देशमुख, श्रीमती चव्हाण, धर्मापुरी गावच्या सरपंच श्रीमती दिक्षा पैठणे, डॉ.दिगंबर पटाईत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ गजानन गडदे म्‍हणाले की, महिलांनी बचत गटात सहभागी होऊन आर्थिक स्वावलंबी व्हावे जेणेकरून कुटुंबाचा सर्वांगिण विकास होऊन आर्थिक स्थिरता येईल.

श्रीमती स्वाती घोडके यांनी महिलांनी सक्षमपणे बचतगट कशाप्रकारे राबवावे याबाबत मार्गदर्शन केले तर डॉ.मधुमती कुलकर्णी यांनी महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे सक्षम व्हावे याबाबत मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात डॉ. सुनीता पवार म्हणाल्या की प्रत्‍येक शेतीकामात महिलाचा वाटा असतो, प्रत्‍येक काम महिला अधिक जागरुकतेने करतात. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. मधुकर मांडगे यांनी केले तर आभार श्री. दीपरत्न सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानोबा माहोरे, दिगांबर रेंगे, नितीन मोहिते, पांडुरंग डिकळे, शेख सुलताना आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मौजे धर्मापुरी आणि मौजे साटला (ता.जि.परभणी) येथील ६० पेक्षा जास्‍त महिला उपस्थित होत्‍या.