Monday, March 14, 2022

ज्वारीच्‍या मूल्यवर्धनाची गरज ……… संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

मौजे ब्राह्मणगाव (ता. जि. परभणीयेथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्राच्‍या वतीने द्यारेषीय ज्वार पीक प्रात्याक्षिक योजने अंतर्गत दिनांक १४ मार्च रोजी मौजे ब्राह्मणगाव (ता.जि.परभणी) येथे ज्वारीचे मूल्यवर्धन उन्हाळी सोयाबीन लागवड या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर मौजे ब्राह्मणगाव येथील सरपंच श्री दगडूआप्पा काळदाते, उपसरपंच ज्ञानेश्वर काळदाते, सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्हेत्रे, सोयाबीन कीटकशास्त्रज्ञ डॉ राजेंद्र जाधव, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ के आर कांबळे , ज्वार पैदासकार डॉ लक्ष्‍मण जावळे, ज्वार कीटकशास्त्रज्ञ डॉ मोहंमद इलियास, ज्वार रोग शास्त्रज्ञ  डॉ विक्रम घोळवे, प्रा प्रितम भुतडा, डॉ अंबिका मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, शेतक­-यांनी ज्वारीच्या मूल्यवर्धनाकडे वळावे. बाजारपेठीतील मागणीनुसार पॅकिंग, ग्रेडिंग केले तर नक्कीच नफा मिळेल.  विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञानट्रायकोबूस्टजैविक खत यांचा वापर करावा. जास्त आर्थिक फायदयाकरिता शेतमाल प्रक्रीया करुन विक्री करावी. विविध वृत्तमानपत्रात प्रकाशित होणारे कृषि विषयक लेख, बातम्या यांचे नियमित वाचन करावे. विद्यापीठ शास्त्रज्ञांशी संपर्क साधून विविध तंत्रज्ञानाची माहिती घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. डॉ के आर कांबळे  यांनी ज्वारीचे अद्यारेषीय पीक प्रात्याक्षिक ब्राह्मणगावातील शेतकऱ्यांनी समाधानकारक घेतले असुन शेतकऱ्यांनी गट शेती कडे वळण्‍याचे आवाहन केले.

तांत्रिक सत्रात ज्वारीचे सुधारित वाणावर डॉ लक्ष्‍मण जावळे यांनी मार्गदर्शन केले तर ज्वारीचे कीड व्यवस्थापनावर डॉ मोहंमद इलियास, डॉ विक्रम  घोळवे यांनी ज्वारीचे रोग व्यवस्थापन, प्रा प्रितम भुतडा यांनी ज्वारीचे सुधारित लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. तसेच डॉ शिवाजी म्हेत्रे यांनी उन्हाळी बीज उत्पादनावर तर सोयाबीन किड व्‍यवस्‍थापनावर डॉ राजेंद्र जाधव यांनी  मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा प्रितम भुतडा यांनी केले तर आभार शेतकरी प्रतिनिधी आकाश काळदाते यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. मान्यवरांनी अद्यारेषीय पीक प्रात्याक्षिक क्षेत्राची पाहणी केली.