परभणी आत्मा, कृषि विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ मार्च रोजी मौजे म्हाळसापूर (ता सेलु जि परभणी) येथे तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. कमलाकर आवटे हे होते तर पोलिस पाटील श्री पांडूरंग सोळंके, मार्गदर्शक प्रभारी अधिकारी तथा रेशीम तज्ञ डॉ.चंद्रकांत लटपटे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री.धनंजय मोहोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ चंद्रकांत लटपटे यांनी रेशीम किटक संगोपनाबददल मार्गदर्शन करून शेतकरी गट स्थापना करून नानासाहेब कृषि संजिवनी योजना (पोक्रा) अंतर्गत शेतकयांनी विविध शेती विषयक योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन केले. तर श्री. धनंजय मोहोड यांनी कमी खर्चात तुती रोपवाटीका तयार करण्याबददलची माहिती दिली.
सुत्रसंचालन श्री.बलभिम आवटे (कृषि सहाय्यक) यांनी केले तर आभार डॉ.संजोग बोकन यांनी म्हणाले. कार्यक्रमास ६० पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि सहाय्यक श्री.बबन जगदाळे, बीटीएम आत्मा श्री सोमेश हुगे आदीसह गावातील रेशीम उद्योजक शेतकयांनी परीश्रम घेतले.