मौजे सायाळा खटींग येथे जलशक्ती अभियानांतर्गत अंतर्गत जल संवर्धनाची शपथ व संवाद कार्यक्रम संपन्न
परभणी जिल्हा परिषद आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनांक २९ मार्च रोजी जलशक्ती अभियान अंतर्गत जलसंधारणाची शपथ आणि संवाद कार्यक्रमांचे परभणी तालुक्यातील सायाळा खटींग या ग्रामपंचायतीमध्ये आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या जलशक्ती अभियांनातर्गत कॅच द रेन व्हेअर इट फॉल्स, व्हेअर इट फॉल्स या मोहिमेला अनुसरून जिल्हयातील नागरिकांमध्ये पाणी बचतीचा संदेश पोहोचावा म्हणुन सायाळा खटिंग ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ आणि युवकांनी जलसंर्धवनणाची शपथ घेतली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणुन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री शिवानंद टाकसाळे हे होते, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओमप्रकाश यादव, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र तुबाकले, गट विकास अधिकार श्री शिवाजी कांबळे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ मधुकर खळगे, डॉ विजय जाधव, डॉ अनुराधा लाड, विस्तार अधिकारी
श्री विश्वनाथ पुरी, सरपंच श्री काळे, ग्रामसेवक चंद्रमुनी चावरे, लेखाधिकारी श्री
विष्णु कारले, माऊली खटिंग, संवाद ज्ञानेश्वर गायकवाड आदीची मुख्य उपस्थिती होती.
मार्गदर्शनांत मा श्री शिवानंद टाकसाळे म्हणाले
की, युवकांनी आपले ध्येय निश्चित करून त्याच्या
पुर्तीसाठी कठोर परिश्रम घ्यावा. युवक हे समाजातील खरी ताकद आहे, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब
आंबेडकर, डॉ एपीजे अब्दुल कलाम यासाररख्या थोरपुरूषांचा
आदर्श घेऊन त्यांचा विचारांचा अंगीकार करावा. ग्रामस्थ आणि युवकांनी मिळुन गावात
स्वच्छता, जल संवर्धन, वृक्षांची लागवड व जोपासना आदी समाजोपयोगी कामे हाती घ्यावीत. यावेळी गावाच्या
परिसरात असलेल्या वृक्षांच्या संवर्धन करण्याचे आवाहन मा श्री शिवानंद टाकसाळे यांनी
गावक-यांनी केले.
आपल्या भाषणात श्री राजेंद्र तुबाकले म्हणाले
की, युवकांना व ग्रामस्थांना यांनी गावाची स्वच्छता
व पाण्याचे संवर्धन करण्यासाठी कार्य करावे. युवकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्या
निश्चित केलेले ध्येय प्राप्त करता येते. तर श्री ओमप्रकाश यादव यांनी संतांच्या
दृष्टांत देते म्हणाले की, राष्ट्रीय स्वच्छता, पाणी बचत व वृक्ष लागवडीत आदीत सर्वांनी सामुदायिकरित्या पुढाकार घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रविण कापसे यांनी
केले, सुत्रसंचालन डॉ विजय जाधव यांनी केले तर आभार
डॉ अनुराधा लाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयोचे स्वयंसेवक व स्वयंसेविका, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. मौजे सायाळा खटींग येथे रासेयोचे विशेष शिबिर
घेण्यात येत असुन यात ग्राम स्वच्छता, वृक्ष संवर्धन, हुंडाबळी नाटीका, व्यसनधीनता पथनाटय
आदीसह विविध मार्गदर्शनपर उपक्रम राबविण्यात येत आहे.