Thursday, March 3, 2022

सेंद्रीय पध्दतीने शेतीतील तण व्यवस्थापन आवश्‍यक ....... विषय विशेषज्ञ डॉ. राजेश भालेराव

वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक  मार्च रोजी सेंद्रीय शेतीतील तण व्यवस्थापन यावर तोंडापुर (हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. राजेश भालेराव यांच्या व्‍याख्‍यानाचे तर जैवऊर्जा आधारीत शेती (बायोडायनॅमीक शेती) यावर सेवानिवृत्त उपसंचालक (कृषी) श्री. प्रदीप कुलकर्णी यांच्‍या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उपसंचालक संशोधन डॉ. अशोक जाधव हे होते तर मौजे (ता. वसमत जि. हिंगोली) येथील प्रगतशील शेतकरी श्री. अंबादास उजवनकर, आयोजक प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरेविभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडकेडॉ. मिनाक्षी पाटीलडॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. 

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. अशोक जाधव म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये तण नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्यास 80 टक्के तणांचे नियंत्रण करणे साध्य होइल. त्या प्रामुख्याने पेरणीपुर्व मशागत, चांगल्या कुजलेल्या शेण खताचा वापर, तणांच्या बियाणे विरहीत शेणखताचा वापर, फुलावर येण्यापुर्वी तणांचे निर्मुलन, तसेच जलद वाढणारी तणांना दाद न देणारी पिके घेणे, आंतर पिक पध्दती, पिक फेरपालट यावार भर द्यावा, असे ते म्‍हणाले.

मार्गदर्शनात प्रमुख वक्ते डॉ. राजेश भालेराव म्‍हणाले की, सेंद्रीय शेतीमध्ये जिवो जीवस्य जीवनम’’ हा एक गाभा आहे. किड व रोगाप्रमाणेच शेतीतील तणांचा प्रादुर्भाव होणे ही एक मुख्य समस्या आहे. तणंाच्या प्रादुर्भावामुळे साधारणत: 33 टक्के  नुकसान होते. तण व्‍यवस्‍थापनात प्रतिबंधात्मक उपायामध्ये प्रमाणित बियाण्याचा वापर, कृषि अवजारांची स्वच्छता ठेवणे, सिंचनाचे पाट तण विरहीत ठेवणे, चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत वापरणे, गुरांचा शेतात वावर थांबवने जेणे करुन त्यांच्या विष्ठेतील तणांच्या बिया शेतात पसरणार नाहीत व तणांचा प्रसार होणार नाही. त्याच बरोबर मशागत पध्‍दतीत पिकांची फेरपालट करणे, पिक अच्छादनाचा वापर करणे, खते ही पिकांच्या मुळाशी देणे. पेरणीपुर्व मशागत चांगल्या प्रकारे करणे, जैविक उपायामध्ये तणांवर उपजिविका करणारे किडी, जीवजंतु यांचा वापर करावा, यात गाजर गवताचा प्रादुर्भाव असल्यास मेक्सिकण भुंग्याचा किंवा तरोटा सारख्या वनस्पतीचा वापर करावा (बीयाणे फेकावे). तणांना मारक ठरणारी पिके किंवा वनस्पतीचा वापर करावा.

प्रमुख वक्ते श्री. प्रदीप कुलकर्णी यांनी बायोडायनॅमीक शेतीबाबत बोलतांना म्‍हणाले की, बायोडायनॅमीक शेती उर्जांचा विचार करायचा की जी उर्जा जीवांची उत्पती करतात व त्यांचा सांभाळ करतात. पर्यावरणास हानी न होता शेती करणे म्हणजेच बायोडायनॅमीक शेती होय. बायोडायनॅमीक शेतीतील जैविक घटक म्हणजे गांडुळ सुक्ष्म जिवाणू, पशुपक्षी व मानव होत. बायोडायनॅमीक शेती हिरवळीचे खत पिकांची विविधता, पिकांची फेरपालट, आच्छादनांचा वापर करावा. त्‍यांनी बायोडायनॅमिक शेतीमध्ये सीपीपी कल्चर कसे तयार करावयाचे व त्याचा वापर याबाबत त्‍यांनी माहिती दिली.

प्रगतशील शेतकरी श्री. अंबादास उजवनकर यांनी आपले सेंद्रीय शेतीतील अनुभव कथन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाशेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदीं मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मिनाक्षी पाटील यांनी केले तर आभार श्री. सतिश कटारे यांनी मानले आणि प्रा.पुंडलीक वाघमारे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, श्री. अभिजीत कदम, श्री. योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.