वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून, तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या
मार्गदर्शनाखाली आणि कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णी
(नांदेड-१) यांच्या समन्वयातून “शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन
कृषि संवाद” या उपक्रमाचा ७० वा भाग “शेतकऱ्यांच्या यशोगाथा”
या विषयावर यशस्वीरित्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित
करण्यात आला.
कार्यक्रमात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी “आमचे शेतकरी, आमचा गौरव”
या मालिकेअंतर्गत “शेतकऱ्यांच्या यशोगाथा” हा
विषय निवडण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत हे शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी
व्यासपीठ असल्याचे नमूद केले.
कृषि विज्ञान केंद्र, पोखर्णीचे प्रमुख डॉ. देविकांत देशमुख यांनी प्रास्ताविक
करताना नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि विज्ञान केंद्राच्या विविध प्रशिक्षण,
मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष बांधावरच्या सल्ल्याद्वारे साधलेल्या
प्रगतीचा उल्लेख केला.
किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ पुरुषोत्तम नेहरकर यांनी शेतकऱ्यांसाठी
ज्ञानवर्धक संवादाचे हे प्रभावी माध्यम असून, या उपक्रमांद्वारे ग्रामीण कृषी परिवर्तनात मोलाची
भूमिका बजावली जात असल्याचे नमूद केले.
यानंतर नांदेड जिल्ह्यातील १४ प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील विविध
यशस्वी प्रयोग, कृषी उद्योग आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अनुभवाचे आदानप्रदान केले. यामध्ये
श्री. नंदप्रसाद जाधव – रेशीम बालकिटक संगोपन, श्रीमती सुनीता
कावळे – आवळा प्रक्रिया उद्योग, श्री. बालाजी महादावड
– चिया पिक लागवड, श्री. अविनाश मुंगल – दुग्ध
व्यवसाय व फुलशेती, श्री. हनुमंत फाटेकर – मशरूम उत्पादन, श्री.
विश्वभर कदम – एकात्मिक शेती, श्रीमती अर्चना माने – ड्रॅगन फळ व
मसाला शेती, श्री. राम मुंडे – सेंद्रिय आंबा व प्रक्रिया
उद्योग, श्री. रवी कावलगावे – शेळीपालन, श्री. गुलाबराव
पावडे – मोरिंगा पावडर उत्पादन व विपणन, श्री. बालाजी उपवार
– स्ट्रॉबेरी लागवड, श्री. कबीरदास कदम – दूध
उत्पादन व प्रक्रिया उद्योग, श्री. गणेश बुरकूल – मधमाशी
पालन आदी शेतकऱ्यांनी त्यांच्या विषयासह उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमिता क्षत्रिय यांनी करून सूत्रसंचालन आणि आभार उत्साहपूर्ण पद्धतीने केले. यावेळी एकूण १२२ शेतकऱ्यांनी ऑनलाईन सक्रिय सहभाग नोंदवून माहिती घेतली. कार्यक्रमात प्रा. माणिक कल्याणकर (पिक संरक्षण तज्ञ), डॉ. महेश अंबोरे (पशुवैद्यक तज्ञ), प्रा. संदीप जायेभाये (कृषि विद्या तज्ञ) आणि श्रीमती अल्का पवळे (गृहविज्ञान तज्ञ) यांनी सहकार्य केले.
.jpeg)
