Saturday, November 8, 2025

शेतकरी आणि विद्यापीठाच्या कल्याणासाठी प्रभू कृषि महादेवाच्या चरणी माननीय केंद्रीय कृषि मंत्री नामदार श्री शिवराज सिंह चौहान आणि वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे साकडे.

 

सिरसाळा (ता. परळी वैजनाथ, जि. बीड) येथील प्रभू कृषि महादेव यांच्या चरणी माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री नामदार श्री. शिवराज सिंह चौहान व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकरी आणि विद्यापीठाच्या कल्याणासाठी साकडे घालत भावपूर्ण पूजाअर्चा केली. या पूजाअर्चेद्वारे शेतकऱ्यांच्या शांती, समृद्धी आणि संपन्नतेसाठी त्यांनी प्रार्थना अर्पण केली. या वेळी ग्लोबल विकास ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष श्री. मयंक गांधी, ट्रस्टचे मान्यवर सदस्य तसेच विद्यापीठातील अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते. ही पूजाअर्चा सिरसाळा येथील ग्लोबल विकास ट्रस्ट (GVT) तर्फे आयोजित दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडलेल्या शेतकरी संवाद मेळाव्याच्या प्रारंभी करण्यात आली.

या प्रसंगी माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री नामदार श्री. शिवराज सिंह चौहान आणि माननीय कुलगुरूंनी प्रभू कृषि महादेवाकडे विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी, अधिकारी तसेच राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या आरोग्य, प्रगती व कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली.

यावेळी माननीय कुलगुरूंनी प्रभू कृषि महादेवाचे दर्शन घेत शेतकरी देवो भवः” या प्रेरणादायी भावनेचा उच्चार केला. त्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत, समर्पित आणि विज्ञानाधारित प्रयत्न सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला. या पूजाअर्चेद्वारे त्यांनी शेती ही श्रद्धा, विज्ञान आणि विकास यांचा संगम आहे, असा संदेश दिला. तसेच शेतकरी सक्षमीकरण, कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार आणि नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी मांडला.

भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना माननीय कुलगुरूंनी म्हटले की, शेतकरी हा आपल्या राष्ट्राचा कणा आहे; त्यांच्या प्रगतीतूनच ग्रामीण भारताचे भविष्य उज्ज्वल होईल. ज्ञान, विज्ञान आणि श्रद्धा या त्रिसूत्रीच्या माध्यमातूनच शेतीत खरी समृद्धी साध्य होऊ शकते.