वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ या
गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने “वंदे मातरम्
सार्धशताब्दी महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन
सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा
योजनेतर्फे करण्यात आले.
या निमित्ताने
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात ‘वंदे
मातरम्’ या गीताचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी ‘वंदे मातरम्’
या गीताचा इतिहास आणि त्यामागील राष्ट्रभावना प्रभावीपणे मांडली.
यानंतर
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी
तसेच महाविद्यालयाच्या पूर्व-प्रायोगिक प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद यांनी
उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ‘वंदे मातरम्’ या गीताचे अतिशय सुरेल पद्धतीने
सामूहिक गायन केले. गीत गायनासाठी शिक्षिका श्रीमती श्रुती औंढेकर आणि शाळेच्या
शिक्षकवृंदाने पुढाकार घेतला, ज्यांचे अनुकरण इतर सर्वांनी
उत्साहाने केले.
या
सोहळ्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमधील देशभक्तीपर भावना आणि सृजनशीलतेला चालना
देण्यासाठी “विविधतेत एकता” या विषयावर निबंध स्पर्धा, देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा आणि “भारताचा
सांस्कृतिक वारसा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
या उपक्रमाचा
प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,
एकात्मता आणि सांस्कृतिक अभिमानाची भावना जागृत करणे तसेच ‘वंदे
मातरम्’ या गीतातील प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचविणे हा आहे.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
