वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील
प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी
प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या समन्वयिका डॉ. वीणा भालेराव यांनी पं. जवाहरलाल
नेहरू यांच्या जीवनकार्याविषयी तसेच त्यांच्या अतुलनीय कार्यांविषयी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रउभारणी आणि भारताच्या
स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांना ‘भारताचे शांतीदूत’
म्हणूनही संबोधले जाते, असे त्यांनी
सांगितले.
कार्यक्रमात
शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केली. तसेच विविध सेक्शनमधील
विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य प्रस्तुती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या सहयोगी
प्राध्यापक तथा अखिल भारतीय समन्वित प्रकल्प (कृषिरत महिला) च्या केंद्र समन्वयिका
डॉ. नीता गायकवाड यांनीही
विद्यार्थ्यांसमवेत नृत्य सादर करून सर्वांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बालदिनानिमित्त
शाळेद्वारे सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन शिक्षिका कु. श्रुती औंढेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेतील
सर्व शिक्षिका, मदतनीस तसेच सर्व
सेक्शनचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



.jpeg)