Wednesday, May 14, 2025

वनामकृवित शेतकऱ्यांसाठी ज्ञानाची मेजवानी!..खरीप पीक परिसंवाद आणि कृषि प्रदर्शन

तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यावर आधारित शेतकऱ्यांना मार्गदर्शन...माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्‍तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने खरीप "खरीप पीक परिंसंवाद व कृषि प्रदर्शन" या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक १८ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री मा.ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि राहणार आहेत. कार्यक्रमास राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा.  श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. . श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. . श्री. विक्रम काळे,  विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. . डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. . श्री रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. . श्री. रमेशराव कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. . श्री. अभिमन्यू पवार आणि विधानसभा सदस्य मा. . श्री राजेश विटेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पुणे येथील कृषि परिषदेचे महासंचालक मा.श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे),  परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे),  महाराष्ट्र शासनाचे माजी कृषि आयुक्त मा. श्री. उमाकांत दांगट हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषद सन्मानीय सदस्य मा. श्री विठ्ठल सकपाळ, मा. श्री सुरज जगताप, मा. श्री. प्रविण देशमुख, मा. श्री. दिलीप देशमुख, मा.डॉ. आदिती सारडा, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, मा. डॉ. व्ही. एम. मायंदे, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर आदींची कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहे.

परिसंवादात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ विविध खरीप पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, ज्वारी, बाजरी, कडधान्ये, भरड धान्यांचे महत्त्व, तसेच कीड व रोग व्यवस्थापन आदी विषयांचा समावेश आहे. यावेळी शेतकरी बांधवांच्या कृषी विषयक शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या विविध घडीपत्रिका, पुस्तिका व शेतीभाती मासिकाचे प्रकाशन करण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित कृषी साहित्याचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात शास्त्रज्ञांसह प्रगतशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार असून, एकाच ठिकाणी तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या चमूमार्फत समस्यावर आधारित चर्चा घडवून आणण्यात येईल. यामध्ये पिकानिहाय उद्योजकता विकास, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीत वैविध्य जपण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन दिले जाईल, असे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी  सांगितले.

कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे. विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत.

-       ज्वारी (परभणी शक्ती)दर  रु १२५/- प्रती किलो, प्रती बॅग ४ किलो, एकूण दर रु ५००/- प्रती बॅग, एकूण ५०० बॅगा उपलब्ध आहेत.

-        मुग (वाण बीएम-२००३-२): दर रु २२०/-  प्रती किलो, प्रती बॅग ६ किलो, एकूण दर रु १३२०/- बॅग असा आहे, या वाणाच्या एकूण ३३० बॅगा उपलब्ध आहेत.

-         तूर - विशिष्ट वाण जसे की , बीडीएन-७१६ (लाल)- ३०० बॅग, बीडीएन-७११ (पांढरी) ३०० बॅग, बीएसएमआर ८५३ (पांढरी) ८० बॅग, बीएसएमआर ७३६ (लाल) १०० बॅग आणि बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) ८०० बॅग हे वाण उपलब्ध असून सर्वांचा दर  रु २५०/- प्रती किलो असून प्रती बॅग ६ किलोमध्ये आहे, एकूण दर रु १५००/- प्रती बॅग असा आहे तसेच बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हा वाण  २ किलोच्या बॅगमध्येही असून त्याच्या १६०० बॅग उपलब्ध आहेत.

-     सोयाबीन वाण - एमएयूएस-१६२ (७५१ बॅग), एमएयूएस-१५८ (३०० बॅग), आणि एमएयूएस- ६१२ (३७६ बॅग) हे उपलब्ध असून सर्वांचा दर  रु१००/- प्रती किलो असून प्रती बॅग २६  किलोमध्ये आहे, एकूण दर रु २६००/- प्रती बॅग असा आहे.

-       भरड धान्य (राळा) वाण: पीडीकेव्ही यशश्री: दर रु १००/- प्रती किलो, १ किलोची बॅग, एकूण दर रु १००/- प्रती बॅग असा असून २०० बॅगा उपलब्ध आहेत.

-       भरड धान्य (नाचणी) वाण: फुले कसारी: दर रु १००/- प्रती किलो, १ किलोची बॅग, एकूण दर रु १००/- प्रती बॅग असा असून २०० बॅगा उपलब्ध आहेत.

      कापूस या पिकाचे सरळ वाण : एन एच १९०१ बीटी आणि एनएच १९०२ बीटी’ या वाणाचे दर रुपये १००/- प्रती किलो असून एक किलोच्या पॅकिंग मध्ये प्रत्येकी १०० बॅग उपलब्ध आहेत तर पीए ८१०’ या वाणाचा दर रुपये ३००/-  प्रती किलो असून २.२५ किलोच्या पॅकिंग मध्ये २० बॅग उपलब्ध आहेत

बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एका वाणाची एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल. सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण  https://www.youtube.com/@VNMKV

विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्‍यात येणार आहे. तरी परिसंवादात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.राकेश अहिरे आणि जिल्‍हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री श्री. दौलत चव्हाण  यांनी केले आहे.