Wednesday, May 7, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माननीय आमदार प्रदीप जैस्वाल यांची सदिच्छा भेट; फळ संशोधन केंद्राच्या विकास कामांना गती

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि छत्रपती संभाजीनगरचे माननीय आमदार श्री. प्रदीप जैस्वाल यांची आज दिनांक ७ मे रोजी शहरातील फळ संशोधन केंद्रात सदिच्छा भेट होऊन महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान संशोधन केंद्राच्या विविध विकास कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः केंद्रातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाबाबत माननीय आमदार श्री. प्रदीप जैस्वाल यांनी पुढील एका महिन्यात हे काम पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली. यावर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल माननीय आमदार श्री. प्रदीप जैस्वाल यांचे आभार मानले व विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, संशोधक तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीनंतर प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी ही भेट विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.