– भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयात सहाय्यक संचालकपदी निवड
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्न तंत्र महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) भारतीय उद्योग विकास सेवा (IEDS) यामध्ये सहाय्यक संचालक (Indian Enterprise Development Services - IEDS) या पदासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) निवड झाली आहे. ही विद्यापीठासाठी आणि संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
या यशस्वी
विद्यार्थ्यांमध्ये केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री.
मारोती दुबे यांची “सहाय्यक संचालक”, ग्रेड-I
या पदावर निवड झाली असून, त्यांचे सार्वजनिक
सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य कौतुकास्पद आहे.
तसेच, सध्या अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात पीएच.डी. अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे
श्री. राहुल कांबळे आणि अलीकडेच एम. टेक. पूर्ण केलेले श्री. हर्षद कुरवारे यांची सहाय्यक
संचालक, ग्रेड-II (IEDS) पदावर निवड
झाली आहे.
या तिन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि, यांनी अभिनंदन केले. विद्यापीठाने अवलंबलेल्या विद्यार्थी केंद्रित
शैक्षणिक धोरणातून गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक सुविधांमुळे विध्यार्थी यशस्वी होत आहेत.
त्यांच्या उल्लेखनीय यशातून विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता दर्शविते आणि ही बाब
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरते, असे
प्रतिपादन केले.
या विद्यार्थ्यांच्या यशाचे संपूर्ण विद्यापीठात कौतुक होत असून त्यांचे, शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ
राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ
अभियंता श्री. दीपक कशाळकर, अन्न तंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश
क्षीरसागर, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी
त्यांचे अभिनंदन केले आहे.
ही घवघवीत कामगिरी विद्यापीठ व महाविद्यालयासाठी गौरवाची बाब आहे. या
तिन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
– Selected as Assistant Directors in the Ministry of Micro, Small, and
Medium Enterprises (MSME), Government of India
Hon’ble Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani congratulates the successful students
Three students from the College of Food Technology, under Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), have achieved remarkable success by being selected through the Union Public Service Commission (UPSC) for the prestigious post of Assistant Director in the Indian Enterprise Development Services (IEDS) under the Ministry of Micro, Small, and Medium Enterprises (MSME), Government of India. This is a matter of great pride for the university and the entire Marathwada region.
Among
these successful candidates, Mr. Maroti Dube, currently serving as a Central
Food Safety Officer, has been selected for the Assistant Director, Grade-I
post. His consistent excellence in the public service sector is truly
commendable.
In
addition, Mr. Rahul Kamble, a current Ph.D. scholar at the College of Food
Technology, and Mr. Harshad Kurware, a recent M.Tech. graduate, have both been
selected for the Assistant Director, Grade-II (IEDS) post.
Hon’ble
Vice-Chancellor Prof. (Dr.) Indra Mani extended his heartfelt congratulations
to the students, stating that this success is a result of the university’s
student-centric academic policies and quality education. He emphasized that
such achievements reflect the academic excellence of the university and serve
as a source of inspiration for students across Maharashtra and the entire
nation.
The
success of these students has been widely appreciated across the university.
Congratulatory messages were also extended by Director of Instruction Dr.
Bhagwan Asewar, Director of Research Dr. Khizar Baig, Director of Extension
Education Dr. Rakesh Ahire, Registrar Shri. Santosh Venikar, Comptroller Shri.
Praveen Nirmal, University Engineer Shri. Deepak Kashalkar, and Associate Dean
of the College of Food Technology Dr. Rajesh Kshirsagar, along with all faculty
members and students.
This
remarkable accomplishment brings great honor to both the University and the
College of Food Technology. Heartfelt congratulations and best wishes to all
three successful candidates for a bright future ahead!