नागपूर येथे विकसित कृषि संकल्प अभियानाच्या अंतर्गत आयोजित भव्य
‘किसान संमेलन’ कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या
प्रदर्शन दालनास मोठा प्रतिसाद लाभला.
या विशेष प्रसंगी
केंद्रीय कृषि मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, राज्याचे कृषिमंत्री मा. ना. ॲड. माणिकराव कोकाटे, आयसीएआरचे
महासंचालक डॉ एम. एल. जाट तसेच शेतकरी बांधव यांनी विद्यापीठाच्या दालनास भेट देऊन
तेथील शेतकरी अनुकूल नवतंत्रज्ञानाची माहिती घेतली.
या प्रदर्शन दालनाचे नियोजन
माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी
केले. विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी
मान्यवरांना विद्यापीठातील विविध नाविन्यपूर्ण संशोधन, तांत्रिक
प्रगती आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाचे सविस्तर सादरीकरण केले. उपस्थित
शेतकरी बांधवांनीही या दालनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यापीठाचे अधिकारी
श्री.जी.बी.भराड, श्री.एम.ए.साखरे, श्री.एन.ए. मोहिते उपस्थित होते.
विद्यापीठाने विकसित केलेली प्रगत वाण, हवामान सुसंगत शेती पद्धती, तंत्रज्ञान आधारित उपाययोजना आणि कृषि प्रक्रिया उद्योगातील संधी यामुळे शेतकऱ्यांमध्ये
नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे या प्रसंगी दिसून आले.
नागपूर येथे 'विकसित कृषि संकल्प अभियान
अंतर्गत आयोजित 'किसान संमेलन' कार्यक्रमात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या प्रदर्शन
दालनास माननीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
श्री.देवेंद्र फडणवीस तसेच शेतकरी बांधव यांनी भेट दिली. यावेळी विद्यापीठाच्या
शास्त्रज्ञांनी त्यांना विद्यापीठातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती दिली.